AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट मोठा युटर्न, म्हणाले, दोन्ही देशांनी..

डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेन आणि रशियाच्या युद्धात काही दिवसांपूर्वीच मध्यस्थी करताना दिसते. फक्त हेच नाही तर त्यांनी रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली होती. भारतावर टॅरिफ देखील लावला. आता रशियाच्या इशाऱ्याला डोनाल्ड ट्रम्प घाबरल्याचे स्पष्ट दिसत आहे.

रशियाच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट मोठा युटर्न, म्हणाले, दोन्ही देशांनी..
Donald Trump and Vladimir Putin
| Updated on: Aug 22, 2025 | 8:32 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेन आणि रशियाच्या युद्धात मध्यस्थी करत आहेत. हेच नाही तर दोन्ही देशांच्या नेत्यासोबत त्यांनी बैठका घेतल्या आहेत. मात्र, युक्रेनकडून फायदा दिसत असल्यानेच ते रशिया आणि युक्रेनच्या मुद्द्यामध्ये पडले आहेत. युक्रेन सरकारने वॉशिंग्टन बैठकीपूर्वीच कराराची ब्लूप्रिंट तयार केल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अमेरिकेकडून याबदल्यात युक्रेनला सुरक्षेची हमी दिली जाणार आहे. मात्र, रशियाने स्पष्ट केले की, रशिया बैठकीला उपस्थित असल्याशिवाय आणि रशियाच्या सहमतीशिवाय युक्रेनला परस्पर कोणीही सुरक्षेची हमी देऊ शकणार नाही. रशियाने युक्रेनवर हल्ले केली आहेत आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेची कानउघडणी केली.

रशियाने केलेल्या कानउघडणीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलल्याचे बघायला मिळतंय. अगोदर दोन्ही देशांच्या नेत्यांना घेऊन स्वतंत्र बैठक घेणाऱ्या आणि रशियाला कल्पना न देता युक्रेनला सुरक्षेची हमी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आता दोन्ही देशांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी. अमेरिकेने युक्रेन आणि रशियाच्या युद्धामधील त्यांचा हस्तक्षेप दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेलेंस्की आणि पुतिन यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावीत असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने म्हटले. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पुढच्या शांती चर्चेला अमेरिका थेट प्रकारे सहभागी होणार नाही. पुतिन आणि जेलेंस्की यांनी दोघांनी एकत्र बैठकीला येऊन निर्णय घ्यावा. त्यामध्ये अमेरिका नसणार आहे. युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव टाकण्याचा अमेरिकेकडून प्रयत्न केला जात होता.

त्यांना युक्रेनकडून मोठा करार करत युद्धातील हत्यार हवी होती. त्यामध्ये अमेरिकाचा मोठा डाव होता. मात्र, रशियाने युक्रेनच्या हमीबद्दल प्रश्न विचारला आणि रशियाला सोबत घेतल्याशिवाय काहीही होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करताच अमेरिकेने आपला निर्णय बदलला आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठीच भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला आहे. मात्र, या काळात रशिया पूर्णपणे भारतासोबत अजून काही करार देखील दोन्ही देशांनी केली आहेत.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.