Donald Trump H-1B Visa : डोनाल्ड ट्रम्प तोंडावर आपटणार? H-1B व्हिसा निर्णयाने अमेरिकेचेच होणार मोठे नुकसान, पण नेमकं कसं?
भारतावर टॅरिफ लादल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एच-1बी व्हिसाच्या नियमांत बदल केले आहेत. यामुळे अनेकांचे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता आहे.

Donald Trump H-1B Visa Decision : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील हे सांगता येत नाही. अलीकडेच त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला. या एका निर्णयामुळे भारताचे मोठे नुकसान होत आहे. आता अमेरिका फस्ट या धोरणाचे पालन करण्याठी ट्रम्प यांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून देणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी H-1B व्हिसाच्या नियमांत मोठा आणि आश्चर्यकारक बदल केला आहे. यामुळे अमेरिकेत जाऊन काम करणाऱ्या हजारो भारतीयांचे स्वप्न आणखी कठीण होऊन बसले आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांचा हा निर्णय त्यांच्याच मुळावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयाचा फटका मुळच्या अमेरिकेतली काही कंपन्यांना बसण्याच धोका असल्याचे बोलले जात आहे.
नेमका काय निर्णय घेतला?
डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B हवा असेल तर साधारण 1 लाख डॉलर्स म्हणजेच साधारण 88 लाख रुपये फिस म्हणून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच अमेरिकेत जाण्यासाठी H-1B व्हिसा 88 लाख मोजावे लागतील. या एका निर्णयाने अमेरिकेत जाऊन काम करत असलेल्या किंवा काम करण्याचाछी इच्छा बाळगणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता नोकरीसाठी अमेरिकेत जाणे फारच मुश्कील होऊन बसले आहे. या निर्णयाचा फटका आता तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्यांना बसणार आहे. यात काही अमेरिकन कंपन्यांचाही समावेश आहे.
अमेरिकेतल्याच कंपन्यांना बसणार फटका?
अमेरिकेने H-1B व्हिसाच्या फीमध्ये वाढ केल्याने आता अॅमोझॉन, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, गुगल यासारख्या टेक कंपन्यांना फटका बसणार आहे. अगोदरच H-1B व्हिसाची फी फारच जास्त आहे. या व्हिसासाठी 1700 ते 4500 डॉलर्सचा खर्च येतो. जेवढा लवकर तुम्हाला H-1B व्हिसा हवा आहे, तेवढे जास्त पैसे तुम्हाला मोजावे लागतात. H-1B व्हिसासाठी लागणारा हा खर्च सामान्यत: कंपन्याच उचलतात. हा खर्च कंपन्या व्यापार खर्च असल्याचे ग्राह्य धरतात. त्यामुळे अमेरिकेत असलेल्या अॅमोझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल यासारख्या कंपन्यांनाच ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या कंपन्यांना बसणार फटका?
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे प्रामुख्याने टेक आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांना जास्त फटका बसणार आहे. येत्या 21 सप्टेंबरपासून ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय लागू होईल. मिळालेल्या माहितीनुसार जून 2025 पर्यंत अॅमोझॉन या कंपनीत 10 हजार 44 कर्मचारी हे H-1B वर काम करतात. दुसऱ्या क्रमांकावर भारतातील टिसीएस कंपनी आहे. त्यानंतर अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅपल, गुगल यांचा समावेश आहे. या टेक कंपन्यांत H-1B व्हिसावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 65 टक्के आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर या कंपन्या नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
