खबरदार… इराणसोबत व्यापार करतायेत? थेट लागणार इतके टक्के टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांची हादरवणारी घोषणा
अमेरिका आणि इराणमधील तणाव चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा मोठ्या धमक्या इराणला दिल्या आहेत. मात्र, तरीह इराण झुकला नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जगाला धक्का देणारा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसत आहेत. हेच नाही तर इराणमधील आंदोलनावर बारीक लक्ष असून त्यांनी गोळीबार केला तर आम्ही सरकारला प्रचंड यातना देऊ असे त्यांनी म्हटले. फक्त हेच नाही तर इराणमधील लोकांचा लढा शेवटी येऊन पोहोचला आहे, विजयाच्या अत्यंत जवळ ते असून खूप वर्षांपासून त्रास सहन करत असल्याचेही त्यांनी म्हटले. एकप्रकारे इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठबळ देताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात थेट भूमिका घेताना इराण दिसले. फक्त तेवढ्यावरच नाही तर आमच्या देशाच्या सुरक्षेमध्ये कोणीही आले तरीही हात कापले जातील असा थेट इशारा देण्यात आला. महागाई आणि इतर काही मुद्द्यांवरून सध्या इराणमध्ये मोठे आंदोलन सुरू आहे. मात्र, हे आंदोलन चिघळताना दिसले आणि सरकारने आंदोलकांवर गोळीबार केला.
अमेरिका इराणला एका मागून एक धमक्या देताना दिसत आहे. थेट हल्ला करण्याचीही धमकी दिली. मात्र, इराणला अडचणीत पकडण्यासाठी अमेरिकेने मास्टर प्लॅन तयार केला. इराणची लष्करी ताकद मोठी असल्याने इराणवर थेट हल्ला करण्यास अमेरिका एक पाऊस मागे आल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे नेहमीची शस्त्र टॅरिफ काढले असून थेट इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना धमकी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशावर टॅरिफ लावला जाईल. म्हणजेच आता इराणसोबत व्यापार करणारे देश संकटात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेकडून इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशावर 25 टक्के टॅरिफ लावला जाईल.हा माझा फायनल आदेश असून त्याची अंमलबजावणी लगेचच केली जाईल.
सध्या ज्याप्रकारे इराणमध्ये आंदोलन सुरू आहे, त्यानंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेक धमक्या इराणला दिल्या आहेत. मात्र, इराण त्यांच्यासमोर झुकताना दिसत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला असून त्यांनी आता इराणला अडचणीत आणण्यासाठी कोणत्याही देशाने इराणसोबत व्यापार केला तर त्या संबंधित देशावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषण केली. याचा परिणाम भारतावरही होईल, कारण भारत आणि इराणमध्ये व्यापारी संबंध आहेत.
अमेरिकेने केलेल्या दाव्यानुसार, इराणमधील आंदोलनात आतापर्यंत 600 लोक मारले गेले आहेत. 10 हजारांपेक्षा जास्त लोक सरकारने ताब्यात घेतले. या आंदोलनाला डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन दिले आहे. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांनी अगोदरच अमेरिकेवर गंभीर आरोप केली असून अमेरिकेमुळेच हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
