AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेने भारतावर पुन्हा टॅरिफ लावला, ट्रम्पचा भारताला मोठा झटका..

US India Tariff : अमेरिकेने पुन्हा एकदा मोठा दणका भारताला दिला. भारतावर अमेरिकेने टॅरिफ लावला आहे. अमेरिकेने लावलेल्या या टॅरिफमुळे भारताला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. भारताच्या शेजारी देशावरही अमेरिकेने टॅरिफ लावला.

अमेरिकेने भारतावर पुन्हा टॅरिफ लावला, ट्रम्पचा भारताला मोठा झटका..
Donald Trump
| Updated on: Jul 24, 2026 | 10:22 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. अमेरिका मोठे हल्ले इराणवर करत आहे. या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसतोय. मात्र, युद्ध काही कमी होत नाहीये. त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला. भारताला ज्याची भीती होती तेच घडले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर टॅरिफचा बॉम्ब फोडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत भारतावर तब्बल 10 टक्के टॅरिफ लावला. भारतासोबतच 17 देशांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दणका देण्यात आला. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी सेक्शन 301 लागू केले. अमेरिकेने नवीन टॅरिफ धोरण जाहीर केले. त्यांनी फोर्स्ड लेबर उत्पादनांना दिलासा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर 12.5 टक्के अधिक टॅरिफ लावला.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अनुचित व्यापार पद्धती यांसारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर म्हटले की, मला व्यापार प्रतिनिधींनी सल्ला दिला की, या देशातील अर्थव्यवस्थांमधील वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लावणे आवश्यक आहे. ज्यामुळे निर्बंधांची अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

भारताच्या शेजारी देशांवरही अमेरिकेने यावेळी टॅरिफ लावला. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, कॅनडा, अर्जेंटिना, कंबोडिया, श्रीलंका, मलेशिया, मॅक्सिको, त्रिनिदाद, इंडोनेशिया, होंडुरास, ग्वाटेमाला, इक्वाडोर, अल सल्वाडोर, ब्रिटेन, टोबॅंगो या देशांवर 10 टॅरिफ लावण्यात आला. काही देशांवर 12.5 टॅरिफ लावण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच मोठा टॅरिफ भारतावर लावण्यात आला.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध या टॅरिफच्या मुद्द्यात तणावात आली होती. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यामध्येच भारताला दिलासा टॅरिफपासून मिळाला होता. पण पुन्हा भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत भारतीय वस्तू पाठवणे व्यापाऱ्यांना कठीण होत आहे. अमेरिका भारताला मित्र मित्र म्हणते आणि मोठा टॅरिफ भारतावर लावते.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...