
डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारतावर टीका करताना दिसत आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. फक्त हेच नाही तर भारताकडून टॅरिफचा विरोध होत असताना अमेरिकेने म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केल्यावर आम्ही लगेचच त्यांच्यावरील 50 टक्के टॅरिफ काढू. भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे एक चांगले मित्र आहेत. मात्र, दोघांमधील संवाद आता बंद आहे.
त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल एक वेगळा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा दाैरा रद्द केलाय. न्यूयॉर्क टाईमच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे क्वाड संमेलनात सहभागी होणार नाहीत, त्यांनी भारताचा दाैरा रद्द केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितले होते की, ते भारताच्या दाैऱ्यावर येतील. मात्र, त्यांनी आता त्यांचा भारत दाैरा रद्द केलाय. मात्र, यावर दोन्ही देशांच्या नेत्यांनी काहीही भाष्य केले नाहीये.
सध्या अनेक वर्षातील चांगले संबंध भारत आणि अमेरिकेतील ताणले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दावा करण्यात आला होती की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध रोखले आहे. मात्र, भारताकडून सांगण्यात आले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी बैठकीतून मार्ग काढत युद्ध थांबवले. सुरूवातीपासूनच भारताने या मुद्द्यामध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप चालणार नसल्याचे स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे त्यांचा सांगितल्याने त्यांचा जळफळाट उडाला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी परत दावा करत म्हटले की, मी नरेंद्र मोदी यांना फोन करून युद्ध थांबवा नाही तर तुम्हाला चक्कर येईन इतका मी टॅरिफ लावेल असे सांगितले. त्यानंतर पाच तासाच्या आतमध्ये हे युद्ध थांबले असल्याचे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. अमेरिकेतूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला जोरदार विरोध हा होताना दिसत आहे.