AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारताला तेल आणि गॅस निर्यात करणे तात्काळ थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचे युरोपियन देशांना थेट आदेश, संकट..

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावून धक्का दिला आहे. मात्र, आता अजूनही भारताच्या विरोधात कडक पाऊले उचलताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद करावे यासाठी भारतावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत.

मोठी बातमी! भारताला तेल आणि गॅस निर्यात करणे तात्काळ थांबवा, डोनाल्ड ट्रम्प यांचे युरोपियन देशांना थेट आदेश, संकट..
Donald Trump
| Updated on: Aug 31, 2025 | 7:38 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, म्हणून दबाव टाकताना दिसले. भारताने अमेरिकेचे ऐकले नाही मग त्यांनी थेट भारतावर 50 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजूनही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर भारत झुकत नसल्याने त्यांनी आग ओकण्यास सुरूवात केली. अमेरिकेकडून मिळणाऱ्या धमक्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरील संवाद देखील बंद केले.

भारत पाकिस्तान युद्धाबाबतही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धक्कादायक विधाने करताना दिसले आहेत. भारत आपल्या अटी मान्य करत नसल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे थेट आता मोठे पाऊल उचलत आहेत. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, व्हाईट हाऊसने युरोपीयन देशांना सांगितले आहे की, अमेरिकेने ज्याप्रमाणे भारतावर प्रतिबंध लावले आहेत, तसे तुम्ही देखील लावा. युरोपातून भारताला पाठवण्यात येणारी तेल आणि गॅस लगेग बंद करा, अशी आदेश देण्यात आलीत.

आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आदेशानंतर युरोपीयन देशी भारताबद्दल नक्कीच काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मुळात म्हणजे 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यकडून भारताला धमकावत सांगण्यात आले होते की, तुमच्याविरोधात अजून कडक पाऊले उचलली जाऊ शकतात जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले नाही तर .आता भारताला टॅरिफसोबतच नवीन संकट झेलावे लागेल असे सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे.

अमेरिकेचे म्हणणे आहे की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन विरोधातील युद्धात रशियाला पैसा मिळत आहे. युरोपीयन देशांनी भारताला तेल आणि गॅस निर्यात करणे बंद केले तर याचे गंभीर परिणाम हे भारतावर होऊ शकतात. शिवाय आमच्याप्रमाणेच भारतावर प्रतिबंध लावा म्हणजे टॅरिफ लावा, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना झटका बसला आहे. आता ते भारताला चीन आणि रशियासोबत न जाण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा