भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा, भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नसते तर…
आता नुकताच एका रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आलाय. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने जगावरील मोठे संकट टळले आहे. मात्र, अमेरिकेकडून भारतावर सातत्याने अत्यंत गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ देखील लावला आहे.

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने सांगितले जात आहे की, रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने आम्ही टॅरिफ लावलाय. त्यांनी तेल खरेदी करणे बंद करावे, आम्ही 25 टक्के टॅरिफ कमी करू. युक्रेन संघर्ष हे मोदी युद्ध असल्याचेही अमेरिकेने म्हटले. आता नुकताच याबाबत मोठा अहवाल हा थेट पुढे आलाय आणि अमेरिकेचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट होतंय. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी केले नसते तर एक मोठं संकट जगासमोर उभे राहिले असते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने जर रशियाकडून तेल खरेदी केले नसते तर जगासमोर एक मोठं जागतिक संकट उभे राहिले असते आणि तेच संकट भारताने रोखले आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले असते तर आज कच्च्या तेलाची किंमत ही 200 डॉलर प्रती बॅरल झाली असती किंवा त्यापेक्षाही अधिक. ग्लोबल मार्केटमधून रशियाचे तेल बाहेर गेल्याने ब्रेंट क्रूड ऑईलने किंमतींमध्ये मोठी वाढ केली होती.
मार्च 2022 मध्ये 137 डॉलर प्रती बॅरलपर्यंत या किंमती गेल्या होत्या. त्यानंतरच भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जागतिक संकट टाळले. मुळात म्हणजे भारताने नियमाप्रमाणेच रशियाच्या तेलाची खरेदी केली आहे आणि कोणताही नियम मोडला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी एका मुलाखतीत म्हटले की, रशियाकडून तेल खरेदी करून भारत त्यांना मोठी मदत करत आहे. भारताचा पूर्ण व्यापार हा g7 आणि युरोपीय संघाच्या नियमाप्रमाणेच आहे. उलट भारताने तेलाची काळाबाजारी थांबवली आहे.
भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करून त्याच्यावर रिफायनरी करून जगभरात विकून नफेखोरी करत असल्याचा आरोप हा अमेरिकेकडून करण्यात आला. मात्र, भारताने जर हे केले नसते तर जगभरात मोठे संकट आले असते. भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्याने निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, याचे नुकसान कसे भरून काढायचे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
