Trump Gold Card : आता भारतीयांना मोजावे लागणार तब्बल 8 कोटी, ट्रम्प यांनी आणलं नवं गोल्ड कार्ड!
डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसाबाबत जगाला हादरवून टाकणारा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे आता अमेरिकेत जाण्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागणार आहेत. असे असतानाच आता ट्रम्प यांच्या गोल्ड कार्डची सगळीकडे चर्चा होत आहे.

Donald Trump H-1B Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगालाच अचंबित करणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. हे शुक्ल तब्बल 88 लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे. म्हणजेच भारतीय व्यक्तीला अमेरिकेत जाऊन नोकरी करायची असेल तर H-1B व्हिसा मिळावा यासाठी अगोदर त्या व्यक्तीला तब्बल 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. अन्य देशांसाठीदेखील ही शुल्कवाढ लागू आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या शुल्कवाढीमुळे संपूर्ण जगाचा ताण वाढलेला असताना आता दुसरीकडे ट्रम्प यांच्या यांच्या ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ची सगळीकडे चर्चा होत आहे. या कार्डच्या मदतीने आता अमेरिकेत राहता येणार आहे.
या गोल्ड कार्डमुळे आता अमेरिकेत…
अमेरिकेत प्रत्येक वर्षी लॉटरी पद्धतीने साधारण 85 हजार H-1B व्हिसा वितरित केले जातात. यातील साधारण तीन-चुतर्थांश व्हिसा भारतीयांना मिळतात. मात्र आता ट्रम्प यांनी H-1B व्हिसा मिळवण्यासाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. ही वाढ तब्बल 1 लाख डॉलर्स आहे. सोबतच ट्रम्प यांनी एक नवी व्हिसा प्रणाली चालू केली आहे. या याला द गोल्ड कार्ड असे नाव देण्यात आले आहे. हे कार्ड परदेशी लोकांसाठी असेल. जी व्यक्ती अमेरिकेत राहून काम करू इच्छीते, त्या व्यक्तीसाठी हे द गोल्ड कार्ड मदतीला येईल. ट्रम्प यांनी गोल्ड कार्डविषयी त्यांचे मत व्यक्त केलेले आहे. “या गोल्ड कार्डमुळे आता अमेरिकेत अब्जो डॉलर्स येतील. हेच पैसे कंपन्या तज्ज्ञ लोकांना कामावर ठेवण्यासाठी वापरू शकतील,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार द गोल्ड कार्ड हे यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार यांना मिळेल. हेच कार्ड भविष्यात ग्रीन कार्डची जागा घेईल, असेही आता सांगितले जात आहे.
कोणाला मिळणार गोल्ड कार्ड?
मिळालेल्या माहितीनुसार जो कोणी अर्ज करेल त्याला अगोदर नॉन रिफंडेबल (परत न मिळणारी) फी भरावी लागेल. गोल्ड कार्ड मंजूर झाल्यावर अर्जदाराला 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण 8.3 कोटी रुपये अमेरिकन सरकारकडे जमा करावे लागतील. त्यानंतर अमेरिकन सरकारतर्फे संबंधित अर्जदाराला हे गोल्ड कार्ड दिले जाईल. या कार्डच्या मदतीने संबंधित व्यक्ती अमेरिकेतली सर्व 50 राज्यांत वास्तव्य करू शकते.
ट्रम्प प्लॅटिनम कार्ड काय आहे?
प्लॅटिनम कार्ड हे उद्योगपती, गुंतवणूकदारांना मिळणार आहे. या कार्डचे गोल्ड कार्डपेक्षा जास्त फायदे असतील. या कार्डसाठीची नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. हे कार्ड मंजूर झाल्यास तुम्हाला अमेरिकन सरकारकडे 5 दशलक्ष म्हणजेच साधारण 41.5 कोटी रुपये जमा करावे लागतील. या कार्डच्या मदतीने तुम्हाला अमेरिकेत 270 दिवस वास्तव्य करता येईल. या काळात तुम्हाला अमेरिकेत प्राप्तिकर भरावा लागणार नाही.
कॉर्पोरेट कार्ड काय आहे?
ज्या कंपन्यांना परदेशी कर्मचारी कामावर ठेवायचे आहेत, त्या कंपन्यांसाठी हे कार्ड आहे. या कार्डचे शुल्क साधारण 2 दशलक्ष म्हणजेच 16.6 कोटी रुपये प्रति कर्मचारी असेल. कंपनीला प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नॉन रिफंडेबल फी द्यावी लागेल. या कार्डसाठी वार्षिक मेन्टेनन्स फी तसेच ट्रान्सफर फीदेखील लागेल.
