
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत रशियाच्या तेल कंपन्यांवर बंदी घातली. रशियाला अडचणीत पकडण्यासाठी प्रत्येक प्रयत्न अमेरिकेकडून केली जात आहेत. नुकताच आता न्यू यॉर्क शहराचे नवे महापौर जोहरान ममदानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र, एनबीसी न्यूज मीट द प्रेसमध्ये बोलताना ममदानी यांनी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना हुकूमशाही शासक म्हटले. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प हे मला हुकूमशाही शासक वाटतात. दोन्ही बाजूंनी वैयक्तिक हल्ल्यांनंतर भरलेल्या कटू प्रचारानंतर ही बैठक झाली. डोनाल्ड ट्रम्प ज्याप्रकारे संपूर्ण जगात थैमान घातल आहेत, ते आता अमेरिकन नागरिकांना अजिबातच पटत नाहीये.
जगात अमेरिकेची असलेली शक्ती ते चुकीच्या पद्धतीने वापरत असल्याचा आरोप केला जात आहे. अमेरिकेतूनही त्यांच्यावर जोरदार टीका होतंय. जवळपास सर्वच देशांवर टॅरिफ लावणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतून विरोध होत आहे. चक्क न्यू यॉर्कच्या महापाैरांनीच आता त्यांना हुकूमशाही शासक म्हटले. ममदानी म्हणाले की, मी अजूनही आधी जे बोललो त्यावर विश्वास ठेवतो आणि मला वाटते की आपल्या राजकारणात तेच महत्त्वाचे आहे.
जिथे आपण असहमत असतो. ओव्हल ऑफिसमध्ये मुद्दा मांडण्यासाठी किंवा भूमिका घेण्यासाठी येत नाहीये. मी न्यू यॉर्कमधील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी तिथे येत आहे. ममदानी म्हणाले की, त्यांनी आणि अमेरिकन अध्यक्षांनी न्यू यॉर्क शहरात नॅशनल गार्ड तैनात करण्याच्या पूर्वीच्या धमक्यांवरही चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प न्यू यॉर्क शहरात नॅशनल गार्ड तैनात करण्याबाबत धमक्या देताना दिसले.
त्यांनी यापूर्वी काही शहरांमध्ये नॅशनल गार्ड तैनात देखील केले आहेत. त्यामध्येच त्यांच्याकडून सातत्याने न्यू यॉर्कमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेनंतर ममदानी यांनी स्पष्ट केले की, न्यू यॉर्कमध्ये असे कोणतेही गार्ड तैनात केली जाणार नाहीत. पण त्यांनी सांगितले की, अध्यक्षांनी सांगितले की NYPD सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी तयार आहे.