AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावर तुरी, सर्वात मोठा धक्का, या देशावरील टॅरिफ होणार रद्द, थेट कायदाच…

विषय आणि मुद्दा कोणताही असो डोनाल्ड ट्रम्प हे फक्त आणि फक्त टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. भारतासह अनेक देशांवर मोठा टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावल्याने अमेरिकेविरोधातील रोष वाढताना दिसतोय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावर तुरी, सर्वात मोठा धक्का, या देशावरील टॅरिफ होणार रद्द, थेट कायदाच...
Donald Trump Tariffs Brazil
| Updated on: Oct 29, 2025 | 12:37 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आहेत. ब्राझीलने अगोदरच स्पष्ट केले की, आम्हाला जर तुम्ही मित्र मानत असाल तर अगोदर कर रद्द करा, त्यानंतर बाकी बघू. रिपब्लिकनच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सिनेटने मंगळवारी एक कायदा मंजूर केला. ज्यामुळे ब्राझीलवर जो टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला तो रद्द होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात सिनेटमध्ये अपेक्षित असलेल्या तीन टॅरिफ विधेयकांपैकी पहिल्या विधेयकात कायदेकर्त्यांनी ब्राझीलच्या उपाययोजनांना 52-48 मतांनी मान्यता दिली. यामुळे ब्राझीलवरील मोठे संकट टळू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त ब्राझीलच नाही तर भारतासह अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत, कॅनडावरील कर आणि जगभरातील इतर देशांवरील कर रद्द करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना या आठवड्याच्या अखेरीस मतदानासाठी येण्याची अपेक्षा आहे. इतर देशच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतूनही मोठा विरोध होतोय. H-1B व्हिसाच्या नियमात देखील त्यांनी मोठा बदल केला, ज्याचा फटका अमेरिकेच्या टेक कंपन्यांना बसताना दिसला.

या मतदानामुळे ब्राझीलचा प्रस्ताव रिपब्लिकन-नियंत्रित अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात पाठवण्यात आला, जिथे तो रद्द होण्याची अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क रद्द करण्यासाठी कायद्यावरील कारवाई रोखण्यासाठी हाऊस रिपब्लिकननी मतदान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असताना सिनेटने ही कारवाई केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टॅरिफचे समर्थन करण्यासाठी खोट्या आणीबाणीच्या घोषणांचा वापर केला आहे असा युक्तिवाद करणारे सिनेट डेमोक्रॅट्स, प्रभावित वस्तू आणि वस्तूंच्या किंमती वाढल्याने अमेरिकन ग्राहकांना त्रास होत असल्याने व्यापार कारवाई रद्द करण्यासाठी वारंवार मतदान करण्यास भाग पाडले. यामुळे ब्राझीलसह अजून कोणत्या देशांना दिलासा मिळतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर टॅरिफ लावत असल्याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी टॅरिफ लावल्यानंतरही त्यांनी मोठी धमकी दिली.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष