डोनाल्ड ट्रम्प यांना धडकी, उत्तर कोरियाने दाैऱ्यापूर्वी उडवली झोप, अमेरिकेत खळबळ, थेट क्रूझ क्षेपणास्त्रच..
मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांना टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प चांगलेच चिंतेत आल्याचे बघायला मिळतंय. दक्षिण कोरियाच्या दाैऱ्याअगोदर धक्कादायक घटना घडलीये.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. सध्या ते आशिया दाैऱ्यावर असून अनेक बैठका घेत आहेत. भारत आणि चीनसह अनेक देशांवर त्यांनी मोठा टॅरिफ लावला. युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे जगाला दाखवताना डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. मात्र, हे युद्ध रोखण्यामध्ये त्यांचा मोठा स्वार्थ असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकेला अत्यंत मोठा धक्का बसला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दक्षिण कोरिया भेटीपूर्वी उत्तर कोरियाने समुद्रातून जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांची थेट चाचणी केल्याचे खळबळ उडालीये. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी करण्यात आली.
उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाैऱ्यादरम्यान थेट क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याने जगात खळबळ उडाली असून अमेरिकेची झोप उडालीये. डोनाल्ड ट्रम्प सध्या आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्तर कोरियात आहेत. 29 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ट्रम्प दक्षिण कोरियाला भेट देणार. ट्रम्प यांच्या या दाैऱ्याच्या एक दिवस अगोदर क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली.
उत्तर कोरियाच्या केसीएनएनुसार, समुद्रातून क्षेपणास्त्रे उभ्या दिशेने सोडण्यात आली आणि दोन तासांहून अधिक काळ ते हवेत होते. ही 7,800 सेकंद एका निश्चित मार्गावर उड्डाण केल्यानंतर त्याने आपले टार्गेट गाठले. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी ही हुकूमशहा किम जोंग उन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प याच्या दाैऱ्याच्या एक दिवस अगोदर इतक्या घातक क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याने चर्चांना उधाण आलंय.
मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात भेटू होऊ शकते. सोमवारी टोकियोला जाताना एअर फोर्स वनमध्ये पत्रकारांना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर उत्तर कोरियाचे नेते सहमत असतील तर त्यांना किमला भेटायला नक्कीच आवडेल. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीचा हात पुढे केलेला असताना देखील क्रूझ क्षेपणास्त्रांची करण्यात आली. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाैऱ्यावर बारीर नजर अमेरिकेसह जगाची आहे.
