AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची जगाला धक्का देणारी डिल, कोणालाही न कळू देता थेट… भारतात काय होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी अनेक धक्कादायक असे निर्णय घेतलेले आहेत. असे असतानाच आता त्यांनी कोणालाही न कळू देता एका देशासोबत मोठा करार केल आहे. या करारानंतर आता भारत काय करणार? असे विचारले जात आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची जगाला धक्का देणारी डिल, कोणालाही न कळू देता थेट... भारतात काय होणार?
donald trump
| Updated on: Sep 15, 2025 | 11:05 PM
Share

Donald Trump On TikTok : गेल्या काही दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे काही निर्णय घेतलेले आहेत, ज्याचा भारतासह इतरही राष्ट्रांना मोठा फटका बसत आहे. विशेष म्हणजे मीच शांतीदूत आहे, असा दावा करत ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यासह इतरही अनेक युद्ध थांबवल्याचा दावा केलेला आहे. डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील हे सांगता येत नाही. याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे. त्यांनी चीनच्या एका बड्या कंपनीसोबत महत्त्वाची डिल केली आहे. त्यामुळे आता भारतातही काही निर्णय घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतला?

अमेरिका आणि चीन या दोन देशांत टिकटॉक (TikTok) या सोशल मीडियाबद्दल बराच वाद चालू आहे. मा त्र आता हा वाद संपवण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी अमेरिकेत टिकटॉक चालूच राहील यावर सहमती दाखवली आहे. टिकटॉकची कंपनी आणि अमेरिका सरकार यांच्यात एक महत्त्वाचा करार झाल्याचे बोलले जात आहे. या कराराला शुक्रवारी (19 सप्टेंबर) डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे प्रमुख श्री जिनपिंग यांच्या भेटीत अंतिम स्वरुप दिले जाईल. टिकटॉक अमेरिकेत चालू राहणार असले तरी हा करार करताना अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे, असे अमेरिकेने सांगितले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील अमेरिकेतील युवकांना ही कंपनी वाचावी असे वाटत होते. या कंपनीबाबतही एक करार झाला आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संकेत दिले आहेत.

नेमका वाद काय होता?

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतलेल्या एका कायद्यामुळे अमेरिका आणि टिकटॉकमध्ये वाद चालू होता. या कायद्यात चीनचे कोणतेही अॅप अमेरिकेत बंद करण्याचा अधिकार असल्याची तरतूद करण्यात आली होती. याच तरतुदीनुसार अमेरिकेने बाइटडांस या कंपनीच्या टिकटॉक या अॅपवर 19 जानेवारी 2025 रोजी बंदी घातली होती. ही बंदी घालण्यात आलेली असली तरी अजूनही हे अॅप अमेरिकेत चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारने आतापर्यंत अनेकवेळा या टिकटॉक अॅप बंद करण्याच्या तारखेत बद केला आहे. आता ही शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 होती. त्याआधीच बाइटडांस आणि अमेरिकेत एक करार होणार आहे. या करारानुसार टिकटॉक चालू ठेवण्यासाठी बाइटडांस या कंपनीला ते अॅप अमेरिकेतली एखाद्या माणसाला विकावे लागणार आहे.

भारत असा निर्णय घेणार का?

दरम्यान, अमेरिका आणि बाइटडांस या कंपनीत हा करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता असताना आता भारताची चर्चा रंगू लागली आहे. भारतात टिकटॉक या अॅपवर बंदी आहे. त्यामुळे अमेरिकेत हा करार होत असताना भारत अशा प्रकारचा एखादा करार करायचा विचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...