डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका, पक्षातल्याच नेत्याने आरसा दाखवला; टॅरिफमुळे झाली मोठी चूक?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ट्रम्प टॅरिफ कमी करण्याची शक्यता नसल्यामुळे भारतानेही अमेरिकेसोबतची टपाल सेवा तात्पुरती बंद केली आहे. भारताच्या याच आक्रमक पावित्र्यानंतर आता ट्रम्प यांच्याच एका महिला सहकाऱ्याने महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका, पक्षातल्याच नेत्याने आरसा दाखवला; टॅरिफमुळे झाली मोठी चूक?
donald trump
| Updated on: Aug 24, 2025 | 8:01 PM

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ट्रम्प टॅरिफ कमी करण्याची शक्यता नसल्यामुळे भारतानेही अमेरिकेसोबतची टपाल सेवा तात्पुरती बंद केली आहे. भारताच्या याच आक्रमक पावित्र्यानंतर आता ट्रम्प यांच्याच एका महिला सहकाऱ्याने महत्त्वाचा सल्ला दिला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावावर अमेरिकेतील रिपब्लिन पार्टीच्या नेत्या तथा डोनाल्ड ट्रम्प यांच्यास हकारी असलेल्या निक्की हेली यांनी एक ट्विट केले आहे.

भारताला एका मित्राची गरज

या ट्विटमध्ये त्यांनी दोन्ही देशांमधील सध्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात सुधारणा झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण आशियात चीनचा सामना करायचा असेल तर भारताच्या रुपात एका मित्राची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणूनच ट्रम्प यांनी भारतावर आयातशुल्क लावले आहे. याचा परिणाम म्हणून भारताला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. यावरच हेली यांनी मत व्यक्त केले आहे. भारताला त्यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

निक्की हेली नेमकं काय म्हणाल्या?

निक्की हेली यांनी एक्स या समाजमाध्यावर मत व्यक्त करताना भारत, चीन, अमेरिका, रशिया या चार देशांचा उल्लेख केलाय. ‘रशियन तेलाच्या खरेदीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारांना भारताने गांभीर्याने घेणे गरचेचे आहे. तसेच ट्रम्प यांचे विचार लक्षात घेऊन त्यांनी तोगडा काढण्यासाठी राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करायला हवी. हा तोडगा जेवढा लवकर निघेल तेवढे चांगले होईल,’ असा सल्ला नक्की हेली यांनी भारताला दिलाय.

चीनचा सामना करण्यासाठी भारताची…

तसेच भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या कित्येक दशकांपासून मैत्रीचे संबंध आहेत. हीच मैत्री सध्याच्या वादातून, अशांततेतून बाहेर पडण्यासाठी पुरेशी आहे. भारत-अमेरिकेतील व्यापारविषयक आणि रशियन तेलाच्या आयातिविषयीच्या मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी संवादाची गरज आहे. भारत आणि अमेरिकेची काही समान उद्दीष्टे आहेत. हीच समान उद्दीष्टे आपण विसरता कामा नये. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारतासारख्या मित्राची गरज आहे, असेही मत त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये व्यक्त केले.