
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता थांबले आहे. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली होती. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आले होते. अशातच आता इराण-इस्रायल युद्धाबाबत ट्रम्प मोठा दावा केला आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी मी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींना मृत्यूपासून वाचवले असा दावा केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
माझ्यामुळे खामेनी जिवंत – ट्रम्प
इराण-इस्रायल युद्धाबाबत ट्रम्प यांनी याआधीही अनेक दावे केले आहेत. मात्र आता त्यांनी आपण खामेनींचा जीव वाचवला असल्याचे म्हटले आहे. खामेनींनी म्हटले की, ‘इस्रायलने खामेनींना मारण्याची संपूर्ण योजना आखली होती. मात्र माझ्यामुळे खामेनींवर हल्ला करण्याची योजना थांबवण्यात आली, त्यामुळे आज खामेनी जिवंत आहेत.’
आम्ही इराणला मदत करणार होतो, पण…
पुढे बालताना ट्रम्प यांनी म्हटले की, इस्रायल इराणवर सर्वात मोठा हल्ला करणार होता. मात्र आम्ही इस्रायलचे जेट विमान परत बोलावले. अमेरिका इराणला मदत करणार होती, या देशावर लादलेले अनेक निर्बंध हटवणार होतो. मात्र इराण अमेरिकेविरुद्ध विधाने करत आहे. त्यामुळे अमेरिका आता इराणवरील निर्बंध हटवणार नाही. इराण हा एक उद्ध्वस्त होत असलेला देश आहे, या देशात सर्वत्र मृत्यू दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यांनी गोंधळ निर्माण केला आहे. ट्रम्प यांनी दावा केला की मी खमेनींना इस्रायली हल्ल्यांपासून वाचवले, त्यामुळे त्यांनी माझे आभार मानावेत. तसेच ट्रम्पला असेही वाटत आहे की, इस्रायलनेही त्यांचे आभार मानावे, कारण अमेरिकेने इस्रायलला शस्त्रास्त्रे देऊन मदत केली होती.
सुपर बॉस
डोनाल्ड ट्रम्प यांना संपूर्ण जगाने आपल्याला सुपर बॉस मानावे असे वाटते.नाटोच्या सरचिटणीसांनी ट्रम्प यांना डॅडी ही पदवी दिली आहे. त्यामुळे जगातील देशांनी डॅडी टी-शर्टद्वारे त्यांचे आभार मानावे अशी त्यांची इच्छा आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-इराण युद्ध पेटवल्याचा आरोप असलेल्या ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देखील हवा आहे.