AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्री घेतला खळबळजनक निर्णय, थेट इतके टक्के टॅरिफ, औषध उत्पादन कंपन्या…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या माध्यमातून जगाला धमकावताना दिसत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे काही कंपन्यांचे दिवाळे निघण्याची दाट शक्यता आहे.

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्री घेतला खळबळजनक निर्णय, थेट इतके टक्के टॅरिफ, औषध उत्पादन कंपन्या...
Donald Trump
| Updated on: Sep 26, 2025 | 7:27 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा धक्का पुन्हा एकदा टॅरिफच्या माध्यमातून जगाला दिलाय. 1 ऑक्टोबरपासून काही वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे भारतीय औषध उत्पादन्न कंपन्यांना मोठा धक्काच म्हणावा लागेल. अमेरिकेचा 100 टक्के टॅरिफ जर कंपन्यांनी भरला तर कंपनीचे दिवाळेच निघेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबरपासून नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींवर टॅरिफ लावला जाईल, हे अगदी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफला एखाद्या शस्त्रासारखे वापरत आहेत. त्यामध्येच जगाला हादरवणारा निर्णय त्यांनी घेतला. ट्रम्प  सरकारने 1 ऑक्टोबरपासून परदेशी औषधे, स्वयंपाकघरातील कॅबिनेट, फर्निचर आणि जड ट्रकवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.

भारतातून मोठ्या संख्येने अमेरिकेत औषधे निर्यात केली जातात. आता या निर्णयाचा त्या निर्यातीवर थेट परिणाम होणार हे अगदी स्पष्ट आहे. या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे. या आपल्या निर्णयामुळे अमेरिकन उत्पादनाला चालना मिळेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. भारतीय कंपन्यांसाठी अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ होती. मात्र, आता टॅरिफच्या निर्णयामुळे भारताला झटका नक्कीच बसलाय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, औषधांवर 100 टक्के टॅरिफ (कर), स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीजवर 50 टक्के टॅरिफ, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30 टक्के आणि जड ट्रकवर 25 टक्के टॅरिफ आकारला जाईल. 1 ऑक्टोबर 2025 पासून आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर 100 टक्के टॅरिफ लावणार आहोत. जर एखादी कंपनी ही अमेरिकेत उत्पादन करत असतील तरच त्यांना टॅरिफमधून सवलत मिळेल.

आमच्या अमेरिकन कंपन्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. सोबतच त्यांनी म्हटले, आपल्या मोठ्या जड ट्रक उत्पादकांना अनावश्यक बाह्य स्पर्धेपासून वाचवण्यासाठी मी 1 ऑक्टोबर 2025 पासून जगाच्या इतर भागात उत्पादित होणाऱ्या सर्व जड ट्रकच्या आयातीवर बंदी घालत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक झटके देताना सध्या दिसत आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे फक्त भारतच नाही तर इतरही देशांच्या निर्यातीवर परिणाम होणार हे स्पष्ट आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....