AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर निर्णय घेतलाच… समुद्रात उतरवलं नवं हत्यार, इराणचं आता काही खरं नाही

Donald Trump : अमेरिकेने अवघ्या काही दिवसांमध्ये इराणविरुद्धचे यु्द्ध जिंकण्याची योजना आखली होती, मात्र अद्याप अमेरिकेला यात यश आलेले नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी खतरनाक निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर निर्णय घेतलाच... समुद्रात उतरवलं नवं हत्यार, इराणचं आता काही खरं नाही
Trump Big DecisionImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 27, 2026 | 4:57 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. आता आगामी काळात हे युद्ध आणखी भीषण बनण्याची शक्यता आहे. अमेरिकेने अवघ्या काही दिवसांमध्ये हे यु्द्ध जिंकण्याची योजना आखली होती, मात्र अद्याप अमेरिकेला यात यश आलेले नाही. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. इराणने समुद्रात माईन्स टाकून हा मार्ग अधिक धोकादायक बनवला आहे. तसेच इराणने अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरियर अब्राहम लिंकनवर हल्ला केल्याती माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमेरिकन नौदल बॅकफुटवर आहे. कारण अमेरिकेचे सर्वात मोठे कॅरियर जेराल्ड फोर्ड सध्या ग्रीसमध्ये असून त्याची दुरुस्ती सुरु आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेने खतरनाक हत्यार समुद्रात उतरवले

नोदलाची ताकद कमी झाल्याने अमेरिकेला आपली रणनीती बदलावी लागली आहे. अमेरिकेने प्रथमच समुद्रात चालकविरहित ड्रोन स्पीड बोट्स तैनात केल्या आहेत. अमेरिकन संरक्षण मंत्रीलयानेही याची माहिती दिली आहे. या बोट्स ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ अंतर्गत इराणविरोधात चालू कारवाईत वापरल्या जात असल्याचे अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेने पहिल्यांदाच सक्रिय युद्धात अशा प्रकारच्या बोट्सचा वापर केला आहे. या ड्रोन बोट्सने आतापर्यंत 450 तासांपेक्षा अधिक काळ समुद्रात गस्त घातली आहे आणि हजारो सागरी मैलांचा प्रवास केला आहे. या बोट्सचा उद्देश होर्मुझ आणि आसपासच्या भागांवर सतत नजर ठेवणे आणि संभाव्य धोके आधीच ओळखणे हा आहे. यामुळे इराणला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

गस्तीसोबत हल्ल्याची तयारी?

अमेरिकेच्या या ड्रोन बोट्स गस्तीबरोबरच हल्ला करण्यासही सक्षम आहेत. त्या आत्मघाती पद्धतीने शत्रूसोबत स्वतःचा स्फोट करू शकतात. अमेरिकेने त्यांचा प्रत्यक्ष हल्ल्यासाठी वापर केला आहे की नाही, याची अधिकृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र गेल्या काही काळात अशा प्रकारच्या सागरी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटला युक्रेनने अशाच ड्रोनच्या मदतीने मोठे नुकसान पोहोचवले होते. तसेच इराणनेही खाडी भागात तेल टँकरांवर अशाच ड्रोन बोट्सने हल्ले केले आहेत.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत