हत्तीला बुक्की मारल्यासारखे… डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या अर्थशास्त्रज्ञांनी केली जोरदार टीका, म्हणाले, स्वत:च्या..
डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्या विरोधात निर्णय घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफसोबत मिळून अजून काही मोठे धक्के भारताला दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता अमेरिकेतूनच मोठा आहेर भेटला असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावत मोठा धक्का दिला. हेच नाही तर त्यांनी टॅरिफनंतर H-1B व्हिसावर 88 लाख रूपये शुल्क आकारून भारतीयांना अडचणीत आणण्याचे काम केले. दोन्ही देशांमधील यामुळे तणाव वाढताना दिसत आहे. H-1B व्हिसावर आता शुल्क 100,000 डॉलर्स म्हणजेच 88 लाख रूपये लावण्यात आले. मात्र, ज्यांच्याकडे अगोदरच H-1B व्हिसा आहे, त्यांना हे शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयानंतर अधिकच तणाव वाढल्याचे सध्या बघायला मिळत आहे. भारत देखील अमेरिकेच्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. भारताने जर अमेरिकेच्या कंपन्यांवर कारवाई केली तर हा मोठा धक्का अमेरिकेला बसू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प हे भारताविरोधात जे काही पाऊले उचलत आहेत, त्यावर अमेरिकेतूनही टीका होताना दिसत आहे. अमेरिकी अर्थशास्त्री रिचर्ड वोल्फ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भाष्य करत म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. रिचर्ड यांनी म्हटले की, आपण कर्जावर अर्थव्यवस्था चालू शकत नाहीत. आज ब्रिक्स देश ग्लोबल इकॉनोमिकपेक्षा जी-7 पुढे निघाले. ही ऐतिहासिक गोष्ट आहे की, अमेरिका आणि इतर देश याचा हिस्सा आहेत.
तुम्ही जर भारत, चीन, रशिया आणि इतर ब्रिक्स देशांनासोबत घेऊन चाललात तर वैश्चिक उत्पादन 35 टक्के आहे. दुसरीकडे जी-7 देशांची भागिदारी फक्त 28 टक्के आहे. भारत आणि चीनला केंद्रीत करणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले. अमेरिकेने हस्तक्षेप केल्यानंतरही भारत आणि चीनने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. हे यावरून स्पष्ट समजते की, ताकद कोणाच्या बाजूने आहे.
संयुक्त राष्ट्रच्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर जगातील सर्वात मोठा देश, सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला तुम्ही सांगता काय करायचे आणि काय नाही…हे तर हत्तीला बुक्की मारल्यासारखेच आहे. जर तुम्ही भारतावर टॅरिफ लावून त्यांचे रस्ते बंद कराल तर भारत नक्कीच दुसरे पर्याय शोधेल. तुम्ही ब्रिक्सला नवीन पर्याय शोधण्यासाठी भाग पाडत आहात, असेही त्यांनी म्हटले.
