AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 वर्षे जुनी शवपेटी सापडली, दहशतीखाली लोक, रक्त पिण्यासाठी…

एका व्यक्तीने रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केलीय, त्यासाठी त्याने एक ऑनलाईन याचिका केली. त्याला अनेक लोकांनी समर्थन दिले, परंतू.....

2000 वर्षे जुनी शवपेटी सापडली, दहशतीखाली लोक, रक्त पिण्यासाठी...
| Updated on: Jun 02, 2025 | 5:13 PM
Share

काही आठवड्यांपूर्वी इजिप्तच्या पुरातत्व विभागाने अलेक्झांड्रीया शहरात खोदकाम केले, त्यावेळी त्यांना एक प्राचीन दगडाची शवपेटी (coffin) सापडली आहे. ही शवपेटी इतकी वजनाची होती तिला उचलण्यासाठी मोठे कष्ठ घ्यावे लागले. ही काही साधीसुधी शवपेटी नव्हती ही २००० वर्षे जुनी शवपेटी असून जमीनीच्या १५ फूट खालून खोदकाम करुन तिला काढण्यात आले. या शवपेटीचे आकार आणि वजन असाधारण होते. ही शवपेटी २७ हजार किलोग्रॅम वजनी आणि काळ्या ग्रॅनाईटची बनवलेली होती.

2000 वर्षे जुने coffin

या पुरातन coffin ला शोधल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली आणि संपूर्ण शहरच दहशतीखाली आहे. काही लोकांनी दावा केला की ही शवपेटी शापित आहे. याला उघडताच कयामत येणार आहे. जेव्हा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुरातन coffin चा दरवाजा उघडण्याची घोषणा केली. तेव्हा तर स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध केला. स्थानिकांनी असे केल्यास विनाश अटळ आहे असे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावले.

coffin उघडले…  लोकांचे धाबे दणाणले

अनेक धमक्या आणि दहशतीच्या नंतरही पुरातत्व विभाागाने हा ताबूत अखेर उघडलाच. परंतू कयामत वगैरे काही आली नाही. परंतू जसे शवपेटीचे वजन झाकण उघडले तसे तेथील लोकांचे धाबे दणाणले. या शवपेटीच्या आता तीन मानवी सांगाडे सापडले. या असह्य दुर्गंध आसमंतात पसरला त्यामुळे सर्वांनी आपली नाके झाकून घेतली. हा दर्गंध इतका तीव्र होता की सर्वांनी तेथून काढता पाय घेतला.

ताबूतात सापडलेल्या सांगाड्यांजवळ कोणतीही मुल्यवान वस्तू सापडली नाही. न सोने- चांदीचे दागिने सापडले. कारण इजिप्तच्या ममीजच्या जवळ किमती हिरे, सोन्या चांदीचे दागिने आणि अमुल्य वस्तू ठेवलेल्या असतात, परंतू तशी कोणतीही वस्तू येथे नव्हती. तसेच येथे इजिप्तचे प्रसिद्ध ‘डेथ मास्क’ देखील नव्हते. त्यामुळे असा अंदाज लावण्यात आला की ही ‘ममी’ साधारण गरीब कुटुंबाची असू शकते. या सांगड्यांच्या अभ्यासानंतर त्यास अलेक्झेंड्रिया नॅशनल म्युझियमला पाठवण्यात आले.. आणि ताबूत सैन्याच्या हवाले करण्यात आले आहेत.

परंतू रहस्यासंदर्भात एक अजब आणि आश्चर्यचकीत करणारी गोष्ट समोर आली आहे. एका व्यक्तीने या ताबूतमधील रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्याने एक ऑनलाईन याचिका ( पीटीशन ) सुरु केली. त्यावर आतापर्यंत 31,000 हून अधिक लोकांनी समर्थन दिले आहे. या व्यक्तीने दावा केला ही हे प्राचीन इजिप्तशियन लोकांचे रक्त आहे. जे प्राशन केल्याने अलौकीक शक्ती मिळणार आहे. हे रक्त एखाद्या एनर्जी ड्रीक्स सारखे शक्तीशाली असून त्याने विशेष ऊर्जा प्राप्त होणार आहे असा दावा या व्यक्तीने केला.

घटनेने मजेशीर मीम्स व्हायरल

परंतू पुरातत्व खाते आणि संशोधकांनी हे रक्त वगैरे काही नसून शेकडो वर्षे जमीनीत सांगाड्याभोवती जमलेले हे सांडपाणी असावे. ते प्यायल्याने प्राणही जाऊ शकतात. त्यात संक्रमणकारी बॅक्टेरिया देखील असू शकतात. इंटरनेटवर या घटनेने मजेशीर मीम्स देखील तयार केले गेले. अंधविश्वास आणि इजिप्तची संस्कृती दोन्ही बाजूंनी यावर निरनिराळे दावे केले गेले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.