Elon Musk यांना Tesla ची जगातल्या सर्वात मोठ्या पगाराची ऑफर, रक्कम इतकी मोठी मोजताना पंचाईत
अमेरिकन कंपनी टेस्लाने तिचे सीईओना नव्या वेतनाचे महा तगडे पॅकेज जारी केले आहे. हे आता पर्यंत कोणा सीईओला दिलेले सर्वात मोठी सॅलरी पॅकेज म्हटले जात आहे. परंतू या पॅकेज सोबत कंपनीने त्यांना नव्या जबाबदारीचे ओझेही दिले आहे.

जगातला सर्वात श्रीमंत असामी आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना टेस्लाने अशी ऑफर दिली आहे, ज्यास ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत, ब्लुमबर्गच्या एका बातमीनुसार अमेरिकन कंपनी टेस्लाने इलॉन मस्क यांना सीईओपदी कायम रहाण्यासाठी आणि कंपनीचा उत्कर्ष करण्यासाठी जो पगाराचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. त्याने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. हा पगार आहे १ ट्रीलियन डॉलर ( सुमारे 83,00,000 कोटी ) सांगितला जात आहे. हा इतिहासातला सर्वात मोठा सीईओचा पगार म्हटला जात आहे.
अर्थात ही ऑफर दहा वर्षांसाठीची आहे. ही रक्कम मस्क यांनी एकाच वेळी दिली जाणार नाही. यासाठी त्यांना टेस्लाला अनेक क्षेत्रात मोठे यश मिळवून द्यावे लागणार आहे. खासकरुन कंपनीचा नवा व्यवसाय ‘रोबोटॅक्सी’ व्यवसायाला वाढवावे लागणार आहे, कंपनीची मार्केट व्हॅल्यू आजच्या 1 ट्रीलियन डॉलरवरुन वाढवून किमान 8.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवावी लागणार आहे.
टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंपनीचे लाखो शेअरही मिळतील –
या प्लानच्या अंतर्गत जर मस्क यांनी हे टार्गेट पूर्ण केले तर त्यांना टेस्लाचे लाखो शेअर मिळतील. त्यामुळे त्यांची कंपनीतील भागीदारी 25% टक्क्यांपर्यंत वाढली जाईल. मस्क यांनी आधीच सांगितले आहे की त्यांनी कंपनीत इतका वाटा पाहिजे की भविष्यात कंपनीची दिशेवर त्यांचे मजबूत नियंत्रण कायम राहिल.
या वेतनाच्या प्रस्तावाची तुलना जर त्यांच्या 2018 च्या पॅकेजशी केली तर ती सुमारे 50 अब्ज डॉलर ( सुमारे 4 लाख कोटी ) होती.जिला अलिकडे कोर्टाने रद्द केले होते. परंतू टेस्ला बोर्ड आता नवीन आणि जास्त प्रभावशाली पद्धतीने मस्कना कंपनीशी जोडलेले राखण्याचा प्रयत्न करत आहे.
इलॉन मस्क यांना घ्यावी कंपनीच्या भविष्याची जबाबदारी –
खास बाब म्हणजे या प्रस्तावात ही देखील अट ठेवली आहे की मस्क यांना या पॅकेजचा शेवटचा हप्ता मिळवण्यासाठी कंपनी भविष्यातील सीईओची योजना तयार करण्यासाठी देखील महत्वाची भूमिका निभवावी लागेल. म्हणजे केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे तर कंपनीची पुढील पिढी तयार करण्यासाठी देखील मस्क यांना योगदान द्यावे लागणार आहे.
इलॉन मस्क सध्या टेस्ला तसेच SpaceX, xAI, Neuralink आणि The Boring Company सारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सना संभाळत आहेत. तरीही त्यांनी आपण पुढील पाच वर्षे टेस्लाचे वरिष्ठ म्हणून राहू इच्छीतो असे त्यांनी म्हटले आहे.
