
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर जोरदार टीका केली. पण फार कमी लोकांना माहिती असेल की त्यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी भारतात त्यांचा रियल इस्टेट व्यवसाय सुरु केला होता. तेव्हा कोणालाही वाटले नसेल की हा माणूस एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकेल. साधारण 11-12 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा डोनाल्ट ट्रम्प हे त्यांच्या खासगी विमानाने भारतात आले होते. त्यांना पुण्याला जायचे होते. पण त्यांचे विमान मुंबई विमानतळावर बराच वेळ थांबवण्यात आले होते. त्यांनी परवानगी मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया… ट्रम्प यांचे विमान न्यूयॉर्कहून मुंबईत आले तेव्हा… ट्रम्प हे त्यांच्या खासगी बोइंग...