Venezuela : व्हेनेझुएलाच्या राजधानीत अंदाधुंद गोळीबार, नागरिक पुन्हा दहशतीत, ड्रोन..
अमेरिकेने शनिवारी केलेल्या हल्ल्यातून अद्याप सावरलेले नसतानाच व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती भवनादवळ अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे.

व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये गोळीबार झाला आहे. काराकसमध्ये राष्ट्रपती भवनाजवळ अंदाधुंद फायरिंग झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारामुळे शहरातील नागिरक मात्र दहशतीखाली आहे. मात्र या गोळीबारानंतर व्हेनेझुएलाने लगेचच आपली हवाई संरक्षण प्रणाली ॲक्टिव्ह केली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये एक संशयास्पद ड्रोन दिसला असून त्यानंतर लष्कराने तातडीने कारवाई केली. राष्ट्रपती भवनाजवळ तो ड्रोन तत्काळ पाडण्यात आला. त्यासाठी अँटी-एअरक्राफ्ट शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला.
ड्रोन पाडल्यानंतर, व्हेनेझुएलाचे सैन्य आता ॲक्टिव्ह आहे. चिलखती वाहने आणि लष्करी जवानांनी राष्ट्रपती भवनाला वेढा दिला आहे. तर सरकारने या परिसरातील ड्रोनच्या उपस्थितीचा निषेध केला आहे.
प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाकडून गोळीबार
परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकारने म्हटले आहे. काल मध्य काराकसमधील मिराफ्लोरेस पॅलेसवरून अज्ञात ड्रोन उडताना दिसल्याचे वृत्त समोर येताच, सुरक्षा दलांना रात्री 8 च्या सुमारास प्रत्युत्तर गोळीबार करावा लागला.
Anti-aircraft used to SHOOT DOWN DRONES NEAR PRESIDENTIAL PALACE https://t.co/SQqeLqtblv pic.twitter.com/UPUYjMlNmq
— RT (@RT_com) January 6, 2026
अमेरिकेची रिॲक्शन काय ?
शनिवारी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला. त्यानंतर पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. मात्र आता व्हेनेझुएलात पुन्हा गोळीबार सुरू झाल्याने, संशयाची सुई थेट अमेरिकेकडे वळली आहे. याच दरम्यान आता अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमेरिकेचा यात ( गोळीबारात) कोणताही हात नसल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती भवनाजवळ गोळीबार झाला आणि ड्रोन दिसले, परंतु या घटनेत अमेरिकेचा कोणताही सहभाग नाही, असे व्हाईट हाऊसतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
45 मिनिटं गोळीबार
कराकसच्या अनेक भागात, ज्यामध्ये राष्ट्रपती भवनाचा आजूबाजूचा परिसर देखील समाविष्ट आहे, सुमारे 45 मिनिटे जोरदार गोळीबार सुरू होता असे वृत्त दरम्यान, बीएनओ न्यूजने दिले होते. या घटनेदरम्यान लोकांना ड्रोन तसेच अनेक विमानाचे आवाजही ऐकू आले आणि काही भागात वीजही गेली होती, असेही त्यात नमूद करण्यात आलं होतं.
अमेरिकेने अलीकडेच व्हेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली आहे. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याच्या काही तासांतच हाँ गोळीबार झाला.
शनिवारी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि त्याच वेळी देशाचे पदच्युत अध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यांना ताब्यात घेऊन न्यूयॉर्कला नेण्यात आलं, जिथे त्यांच्यावर ड्रग्जच्या आरोपाखाली खटला चालवला जात आहे. दरम्यान, सोमवारी न्यूयॉर्क शहरातील एका संघीय न्यायालयात हजर राहिलेल्या मादुरो यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला.
