रशियात तब्बल 100 वर्षांने राजघराण्यात शाही विवाह, 103 वर्षांपूर्वीचा तो काळा दिवस, ज्यात अख्खं राजघराणं संपवलं!

वराची आई ग्रँड डचेस मारिया व्लादिमीरोव्हना (Grand Duchess Maria Vladimirovna) आणि युरोपातील शेकडो राजघराणी हजर होती. मारिया यांनी स्वत:ला रशियाच्या शाही सिंहासनाचा वारसदार म्हणून घोषित केलं आहे.

रशियात तब्बल 100 वर्षांने राजघराण्यात शाही विवाह, 103 वर्षांपूर्वीचा तो काळा दिवस, ज्यात अख्खं राजघराणं संपवलं!
तब्बल 100 वर्षांनी रशियाच्या राजघराण्यातील वंशजाचा शाही विवाह झाला.
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 12:59 PM

सेंट पीटर्सबर्ग: तब्बल 100 वर्षांनी रशियाच्या (Russia) राजघराण्यातील वंशजाचा (Former Imperial Family) शाही विवाह झाला. (Grand Duke George Mikhailovich Romanov) ग्रँड ड्युक जॉर्ज मिखाइलोविच रोमानोव्हने इटालियन वधू (Italian bride) व्हिक्टोरिया रोमानोव्हना बेटारीनीशी लग्नगाठ बांधली. रशियाची आधीची राजधानी असलेल्या सेंट पीटर्सबर्गच्या (St Petersburg) सेंट आयझॅक कॅथेड्रलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. (St. Isaac’s Cathedral)

रशियन ऑर्थोडॉक्स पाद्रींनी या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला शाही परिवारातल्या अनेकांनी हजेरी लावली, ज्यात वराची आई ग्रँड डचेस मारिया व्लादिमीरोव्हना (Grand Duchess Maria Vladimirovna) आणि युरोपातील शेकडो राजघराणी हजर होती. मारिया यांनी स्वत:ला रशियाच्या शाही सिंहासनाचा वारसदार म्हणून घोषित केलं आहे. जॉर्ज मिखाइलोविच यांचे पणजोबा ड्युक किरी व्लादिमीरोविच (Grand Duke Kirill Vladimirovich) हे 1917 ला रशियातून पळून गेले होते. त्यावेळी बोल्शेविक क्रांतीमध्ये (Bolshevik revolution) सगळ्या शाही कुटुंबाला संपवण्यात आलं होतं. त्यामुळे ते आधी पळून फिनलँडला आणि नंतर युरोपात गेले.

रशियाच्या शाही कुटुंबाला संपवण्याचा रक्तरंजीत इतिहास

1918 ला झालेल्या क्रांतीमध्ये रशियाचा राजा निकोलस दुसरा (Nicholas II), त्याची पत्नी आणि 5 मुलं येकाटेरिनबर्गला (Yekaterinburg) पळाले. हे शहर मॉस्कोपासून (Moscow) 1450 किलोमीटरवर आहे. तिथं त्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातील तळघरात आश्रय घेतला. मात्र, याची माहिती विद्रोही गटाला मिळाली, त्यानंतर याच तळघरात या सर्वांची हत्या करण्यात आली. अख्खं शाही कुटुंब या विद्रोही गटाने संपवलं. याच क्रांतीदरम्यान जॉर्ज मिखाइलोविचचे आजोबा पळून युरोपात आले. सध्या 40 वर्षांचा असलेल्या जॉर्ज मिखोलविचचा जन्म माद्रिदमध्ये (Madrid) झाला. त्याने आपलं सगळं आयुष्य स्पेन (Spain) आणि फ्रान्समध्ये (France) घालवलं.

मिखोलविचची पत्नी रोमानोव्हना बेटारिनीने याच वर्षी रशियन ऑर्थोडॉक्स धर्म स्वीकारला. तिचं नाव बदलून व्हिक्टोरिया रोमानोव्हना ठेवण्यात आलं. व्हिक्टोरियाचे वडील इटालियन डिप्लोमॅट आहेत. जॉर्ज मिखाइलोविच यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा रशियाला भेट दिली, त्यानंतर 2019 ला ते मॉस्कोलाही गेले.

1917 पर्यंत रोमनोव्ह घराण्याने तब्बल 300 वर्ष रशियावर राज्य केलं. 1917 ला रशियात विद्रोह झाला आणि बोल्शेविक क्रांती झाली. त्यानंतर रशियावर कम्युनिस्ट राजवट सुरु झाली. 2000 साली ऑर्थोडॉक्स चर्चने (Orthodox Church)निकोलस दुसरा, ज्याची विद्रोही गटाने कुटुंबासोबत हत्या केली होती, त्याला संत घोषित केलं. पण सोव्हिएत नेते आणि अधिकारी त्याच्याकडे एक कमकुवत नेता म्हणूनच पाहायचे.

हेही वाचा:

चीनच्या उपग्रहांनी काढलेला ‘तो’ फोटो होतोय व्हायरल, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर चीन कशी ठेवू शकतो नजर

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाच्या टॉप लीडरचा खात्मा, फंडिंग आणि दहशतवादी हल्ल्यांच्या प्लॅनिंगची होती जबाबदारी

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.