AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनच्या उपग्रहांनी काढलेला ‘तो’ फोटो होतोय व्हायरल, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर चीन कशी ठेवू शकतो नजर

China Jilin-1 satellite | हे छायाचित्र साध्यासुध्या कॅमेऱ्यातून टिपले नसून शक्तिशाली उपग्रहांच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. त्यामुळेच सध्या या छायाचित्राची जगभरात चर्चा आहे.

चीनच्या उपग्रहांनी काढलेला 'तो' फोटो होतोय व्हायरल, जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर चीन कशी ठेवू शकतो नजर
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 11:08 AM
Share

नवी दिल्ली: अंतराळ तंत्रज्ञानात चीनने घेतलेली मोठी भरारी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या क्षेत्रातील प्रचंड मोठी गुंतवणूक आणि अवकाशात सोडलेल्या अनेक उपग्रहांमुळे आजघडीला चीन अंतराळ क्षेत्रातील मोजक्या महासत्तांपैकी एक आहे. अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे चीन आजघडीला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवू शकतो. ही क्षमता इतकी अफाट आहे की, पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यावर चीन 10 मिनिटांच्या फरकाने सतत लक्ष ठेवू शकतो.

नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. चिनी सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये छापून आलेले एक छायाचित्र सध्या चर्चेचा विषय आहे. येथील चँगचून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (CUST) यंदाच्या पदवीदान सोहळ्यात हे छायाचित्र टिपण्यात आले होते. मात्र, हे छायाचित्र साध्यासुध्या कॅमेऱ्यातून टिपले नसून शक्तिशाली उपग्रहांच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. त्यामुळेच सध्या या छायाचित्राची जगभरात चर्चा आहे.

विद्यापीठातील काहीजणांना ही कल्पना सुचली आणि त्यानुसार पृथ्वीपासून 650 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून या अनोख्या पदवीदान सोहळ्याची क्षणचित्रे टिपण्यात आली. CUST हे विद्यापीठ चीनमधील जिलिन प्रांतात आहे. याठिकाणी पदवीदान सोहळ्यावेळी विद्यार्थी लाल आणि पिवळ्या रंगाची कार्ड घेऊन CUST हे नावर तयार होईल अशा विशिष्ट रचनेत उभे राहिले होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पावणेदहा वाजता चीनच्या दोन उपग्रहांनी अंतराळातून या सर्वांचा फोटो टिपला.

इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून फोटोसाठी आग्रह

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चीनमधील इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडूनही अशाचप्रकारच्या सॅटेलाईट छायाचित्राचा आग्रह धरण्यात आला. विशेष म्हणजे चिनी उपग्रह नियंत्रित करणाऱ्या चँग गुआंग उपग्रह तंत्रज्ञान कंपनीनेही (CGSTC) या प्रस्तावाला होकार दिला. आम्ही जगातील कोणत्याही महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाचा फोटो दिवसा किंवा रात्री कधीही टिपायला तयार आहोत, असे CGSTC कडून सांगण्यात आले. CGSTC कडून अंतराळात चिनी उपग्रहांचे एक जाळे तयार करण्यात आले आहे. यामध्ये पृथ्वीपासून अगदी जवळच्या अंतरावर फिरणाऱ्या 138 उपग्रहांचा समावेश आहे. त्यामुळे चीन जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील छायाचित्रे क्षणात मिळवू शकतो. जिलिन-1 नेटवर्कमधील उपग्रह रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर चालवले जातात. या माध्यमातून जगातील कोणत्याही भागातील घडामोडींवर लक्ष ठेवले जाऊ शकते. सध्या या नेटवर्कचा वापर कृषी, वृक्षसंगोपन, पर्यावरण निरीक्षण, स्मार्ट सिटी, भौगोलिक नकाशे तयार करण्यासाठी केला जातो.

पाकिस्तानला पुरवली जातात छायाचित्र

जिलिन-1 नेटवर्कमधील उपग्रहांच्या माध्यमातून टिपण्यात आलेली माहिती ऑगस्ट 2020 मध्ये पाकिस्तानला पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या स्थानाविषयीचा गोपनीय तपशील आणि छायाचित्रांचा यामध्ये समावेश होता. सप्टेंबर 2020 मध्ये जिलिन-1 नेटवर्कमधील 9 उपग्रहांचे एकाचवेळी प्रक्षेपण करण्यात आले होते. जिलिन -1 नेटवर्कमधील उपग्रह हे हलक्या वजनाचे आहेत. यामध्ये हाय रिझ्योल्यूशन अल्ट्रा लाईट कॅमेऱ्यांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.