AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड मोठ्या संकटानं हादरलं, रात्री दीडच्या सुमारास संपूर्ण देशात इमर्जन्सीची घोषणा, नागरिक मुठीत जीव घेऊन पळत सुटले

ब्रिटनमध्ये रात्री दीडच्या सुमारास अचानक इमर्जन्सी लागू करण्यात आली, इमर्जन्सी लागू करण्यात आल्यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडाला, दरम्यान अजूनही धोका कायम असून, संकट अद्याप टळलेलं नाहीये.

इंग्लंड मोठ्या संकटानं हादरलं, रात्री दीडच्या सुमारास संपूर्ण देशात इमर्जन्सीची घोषणा, नागरिक मुठीत जीव घेऊन पळत सुटले
इंग्लंडमध्ये पूर संकट Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2025 | 5:40 PM
Share

ब्रिटनमधे रात्री दिडच्या सुमारास अचानक आणीबाणी लागू करण्यात आली, यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. पर्यावरण एजन्सीकडून अलर्ट देण्यात आला होता, या अलर्टच्या पार्श्वभूमीवर देशात इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. सध्या वातावरण शांत आहे, मात्र अजूनही ब्रिटनमधील धोका टळलेला नाहीये, क्लॉडिया वादळानंतर आता देशाच्या अनेक भागांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळामुळे इंग्लंडमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान शनिवारी दुपारपर्यंत इंग्लंडमध्ये 58 पेक्षा अधिक पुरांचा इशारा तसेच 150 हून अधिक पूर सूचना तेथील सरकारकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत. अजूनही धोका टळलेला नसून, अनेक नद्यांची पाणीपातळी ही अजूनही कमी झालेली नाही, त्यामुळे देशात काही ठिकाणी पुन्हा पूर येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ब्रिटनला पुराचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत वीसपेक्षा अधिक घरं ही पाण्यात पूर्णपणे बुडाली आहेत, तर तब्ब 12000 कुटुंबांचं या पुराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. इंग्लंडमध्ये पुराचा मोठा फटका बसला असून, प्रचंड नुकसान झालं आहे. पावसामुळे नद्यांना येऊन गेलेल्या पुरानंतर आता देशात युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. बचाव यंत्रणेकडून पावसामुळे आणि पुरांच्या तडाख्यामुळे कोसळलेल्या घरांचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान याबाबत बोलताना फ्लड ड्यूटी मॅनेजर असलेल्या कुटबर्टसन यांनी म्हटलं की, आम्ही अशा सर्व लोकांच्या पाठीशी आहोत, ज्यांनी या पुरामध्ये आपलं घर गमावलं आहे, जे बेघर झाले आहेत, पूर येण्याच्या आधीच अलर्ट दिल्यामुळे मोठं नुकसान टळलं आहे, मात्र देशाच्या अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे.

अतिमुसळधार पावसामुळे इंग्लंडमध्ये हाहाकर उडाला आहे, नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत, दरम्यान नद्यांना आलेला पूर अजूनही ओसरलेला नसल्यामुळे बचाव कार्यात देखील अडचणी येत आहेत, ब्रिटनच्या पर्यावरण एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस तरी नद्यांना पूर कायम राहणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...