AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 वर्षांत पहिल्यांदाच असे आक्रीत घडले, कुवैत असे काही केले की जग झाले हैराण…

इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे पश्चिम आशियातील तेलाची वाहतूकीवर परिणाम झाला आहे. सध्या सीजफायर सुरु असली तर युद्धसमाप्तीसाठी बोलणी सुरु होतात का ? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

30 वर्षांत पहिल्यांदाच असे आक्रीत घडले,  कुवैत असे काही केले की जग झाले हैराण...
oil tanker in strait of hormuz
| Updated on: May 05, 2026 | 10:03 PM
Share

Kuwait Crude Halt: एकीकडे मध्य पूर्वेतील संघर्ष अजून संपलेला नाही. आखातात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. टँकर्स ट्रॅकर्सच्या बातमीनुसार कुवैतने एप्रिल २०२६ च्या दरम्यान एकाही बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केलेली नाही. गेल्या तीन दशकात हे पहिल्यांदा झालेले आहे. जर या वृ्त्ताला अधिकृत दुजोरा मिळाला तर हे १९९१ च्या आखाती युद्ध संपल्यानंतरची पहिली अशी वेळ असेल जेव्हा कुवैतची मासिक कच्च्या तेलाची निर्यात झिरो राहिली आहे.

निगराणी समुहाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत सांगितले की कुवैतने एप्रिल महिन्यात कच्च्या तेलाची कोणतीही निर्यात केलेली नाही. मात्र, देशात तेलाचे उत्पादन जारी आहे. बातमीनुसार कुवैत आपल्या उत्पादित तेलाचा काही हिस्सा स्टोरेजमध्ये ठेवला आहे. तर उर्वरित भागाला रिफाईंड प्रोडक्ट्समध्ये बदलून त्याची निर्यात केली जात आहे.

निर्यात थांबण्याचे कारण काय ?

बातमीनुसार क्षेत्रिय शिपिंग मार्गात आलेल्या व्यत्यय याचे कारण असू शकते. तसेच स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वाढता तणाव देखील याला मोठे कारण म्हटले जात आहे.

कतारने इराण केले आवाहन

या दरम्यान कतारने इराणला आंतरराष्ट्रीय कायदा आणि युएन चार्टरचे पालन करण्याची अपिल केली आहे. कतारने म्हटले आहे की क्षेत्रिय तणावाला कमी करण्यासाठी आणि मध्य पूर्वेत स्थिरता कायम राखण्यासाठी सर्वच देशांनी संयम बाळगावा असे म्हटले आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझवरुन इशारा

कतारने परराष्ट्र मंत्रालयाच्यानुसार पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल-थानी यांना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा फोन आला होता. बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की नौकावहनाच्या स्वातंत्र्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करणे क्षेत्र आणि जगासाठी गंभीर संकट निर्माण करु शकते.

अमेरिकेत वाढल्या हालचाली

याच दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांड ( CENTCOM ) ने सांगितले की गेल्या २० दिवसात अमेरिकेने फारस खाडी, खास करुन स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये ४८ जहाजांचा मार्ग बदलला आहे. अमेरिकेच्या नौदलाचे जहाज USS News Orleansला अरबी समुद्रात तैनात कले आहे आणि या क्षेत्रातील हालचालींवर अमेरिका लक्ष ठेवून आहे.

दुसरीकडे इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी म्हटले आहे की अमरिकेला पाकिस्तानच्या द्वारे इराणने अलिकडे पाठवलेला राजकीय प्रस्ताव दोन्ही देशांतील तणाव संपवण्यासाठी आणि कायम स्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देश्याने पाठवलेला आहे. इराण चर्चेसोबतच कोणत्याही स्थितीशी मुकाबला करण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी