France Lockdown | फ्रान्ससह पॅरिसमध्ये पुन्हा लॉकडाऊन, गाईडलाईन्स जारी

फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टॅक्स यांनी गुरुवारी चार आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. (France and paris increase lockdown)

France Lockdown | फ्रान्ससह पॅरिसमध्ये पुन्हा लॉकडाऊन, गाईडलाईन्स जारी
Paris

नवी दिल्ली :  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता फ्रान्ससह पॅरिसमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुढील एका महिन्यात हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि शाळा सुरु राहणार आहेत. फ्रान्समध्ये आतापर्यंत 42 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 91 हजार 800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. (France and paris increase lockdown after corona increase)

पॅरिससह 16 शहरात चार आठवड्यापर्यंत लॉकडाऊन 

फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टॅक्स यांनी गुरुवारी चार आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता फ्रान्सची राजधानी परिसमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पॅरिससह 16 शहरात शुक्रवारपासून चार आठवड्यापर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान शाळा, जीवनावश्यक वस्तूंचे दुकान, बुक स्टोअर खुले राहणार आहे.

फ्रान्समधील लॉकडाऊनच्या नव्या नियमावलीनुसार, बहुतांश भागात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने सुरु राहतील. इतर सर्व दुकानं बंद ठेवली जाणार आहे. त्याशिवाय नव्या नियमांनुसार जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम पर्याय देण्यात आले आहे. परवानगी असल्याशिवाय घराबाहेर पडता येणार आहे. कोणालाही आपल्या घरापासून 10 किमीपेक्षा जास्त दूर जाता येणार नाही.

कोरोना लस वापरण्यास पुन्हा सुरुवात

कोरोना लसीच्या वापरानंतर काही रुग्णांना त्रास होत असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर अनेक देशांनी या लसीचा वापर तात्पुरता थांबवला होता. यानंतर स्पेन आणि इटलीकडून अ‍ॅस्ट्रॅजेनेका ही कोरोना लस वापरण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे.

तसेच आयर्लंड, नेदरलँड्स, नॉर्वे, डेन्मार्क, आईसलँड, कांगो, बल्गेरिया, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांनीही लसच्या वापरासाठी तात्पुरती बंदी घातली आहे. त्यानंतर इटली आणि फ्रान्सने ही बंदी उठविण्याचा निर्णय घेतला. आता स्पेननेही अ‍ॅस्ट्रॅजेनेकावरील तात्पुरती बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

लसीवर बंदी का?

युरोपातील अनेक देशांनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लस तात्पुरती बंदी घातली होती. ही लस घेतल्यानंतर काही लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी जमा झाल्या होत्या. ज्याचा वाईट परिणाम झाला होत होता. त्यामुळे अ‍ॅस्ट्रॅजेनेकावर बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा फक्त एक राजकीय निर्णय होता, असा दावा करण्यात आला होता. (France and paris increase lockdown after corona increase)

संबंधित बातम्या : 

मालमत्ता खरेदीत स्वारस्य! मग फक्त 80 लाखांत खरेदी करा 11 एकरचा सुंदर Private Scottish Island

Pakistan Corona : तिसऱ्या लाटेने पाकिस्तान भयभीत, लसीचा तुटवडा, इम्रान खान यांनी कोणती लस घेतली?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI