व्हाईट हाऊस पासून ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरापर्यंत, जगात अशी साजरी होतेय दिवाळी
Diwali 2024 : दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतो. जो फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आता साजरा केला जातो. भारताशिवाय जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जातेय. यंदाही अमेरिका, पाकिस्तान, यूएई, ब्रिटनपासून इस्रायलपर्यंत दिवाळी साजरी होत आहे. जगभरातील अनेक बड्या नेत्यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Diwali 2024 : गुरुवारी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. जगातील अनेक मोठ्या नेत्यांनी आज दिवाळी साजरी केली आहे आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थ असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये देखील दिवाळी साजरी केली जात आहे. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी उत्सवादरम्यान लष्करी बँडने ‘ओम जय जगदीश हरे’ या आरतीची धून देखील वाजवली. या काळात सांस्कृतिक विविधतेचे अनोखे दर्शन घडले.
व्हाईट हाऊसमधील दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकारणी, अधिकारी आणि कॉर्पोरेट जगतातील जवळपास 600 भारतीय अमेरिकन सहभागी झाले होते. यावेळी जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसच्या ब्लू रूममध्ये दिवा लावून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
The #WhiteHouse Military Band’s performance of ‘Om Jai Jagdeesh Hare’ marks a historic celebration of #Diwali, embracing cultural diversity and unity. #Diwali #Diwali2024 #FestivalOfLights #HappyDiwali pic.twitter.com/6fGig0bVXi
— DD News (@DDNewslive) October 31, 2024
ब्रिटीश पंतप्रधानांनी पेटवले दिवे
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याचे सांगून तो आनंदाने साजरा केला पाहिजे असेही म्हटले आहे. दिवाळी साजरी करतानाचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, यूकेमध्ये दिवाळी साजरी करणाऱ्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. मी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा सण एकत्र येण्याचा आणि अंधारावर विजय मिळवणाऱ्या प्रकाशावर आपले लक्ष केंद्रित करण्याचा क्षण आहे.
Happy Diwali to all those celebrating across the UK, I wish you and your family a joyful celebration.
This is a time of coming together, abundance and welcome, and a moment to fix our eyes on the light which always triumphs over the darkness. pic.twitter.com/UXSHnXEI7w
— Keir Starmer (@Keir_Starmer) October 31, 2024
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘पाकिस्तान आणि जगभरात राहणाऱ्या आमच्या हिंदू समुदायाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिव्यांचा हा सण सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. आपण विविधतेत एकता साजरी करूया आणि आपल्या राष्ट्राला मजबूत बनवणाऱ्या बंधनांना बळकट करत राहू या.
Warmest wishes to all those celebrating Diwali in the UAE and across the world. May the festival of lights bring joy, peace, and safety to you and your loved ones. Let the light in your hearts guide you toward harmony, compassion, and shared understanding. Happy Diwali!”
— HH Sheikh Mohammed (@HHShkMohd) October 31, 2024
यूएईचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद यांनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र ट्विट करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले, ‘यूएई आणि जगभरातील दिवाळी साजरी करणाऱ्या सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. दिव्यांचा हा पवित्र सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो आणि देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सदैव सुरक्षित ठेवो. तुमच्या हृदयाचा प्रकाश तुम्हाला सुसंवाद, करुणा आणि एकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करेल. दिवाळीच्या शुभेच्छा!’