पुतिन यांच्या भारत दाैऱ्याने बावचाळले 7 देश, जगाला हादरवणारा निर्णय, थेट…

Vladimir Putin India Meet : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दोन दिवसीय दाैऱ्यावर होते. आता पुतिन रशियाला परतले असून यादरम्यान धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पुतिन यांच्या विरोधात अनेक देश मैदानात उतरले असून मोठा कट रचला आहे.

पुतिन यांच्या भारत दाैऱ्याने बावचाळले 7 देश, जगाला हादरवणारा निर्णय, थेट...
Vladimir Putin India Meet
| Updated on: Dec 06, 2025 | 1:01 PM

रशिया युक्रेन युद्धादरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर होते. पुतिन यांच्या या दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. अनेक महत्वाचे करार भारत आणि रशियात झाली. रशिया भारताला अगोदर प्रमाणेच ऊर्जा पुरवठा करणार असल्याचे स्पष्ट झाले. भारतावर अमेरिकेचा प्रचंड दबाव अमेरिकेचा आहे, त्यामध्येच या दबावाला बळी न पडता रशियाकडून तेल खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतली. मात्र, यामुळे अमेरिकेची दुटप्पी भूमिका पुढे आली. पुतिन यांनी स्वत: स्पष्ट केले की, अमेरिका रशियाकडून विविध ऊर्जा आयात करतो. मग भारताला का रोखले जात आहे? अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर जगाने पुन्हा एकदा रशिया आणि भारताची मैत्री बघितली. पुतिन तब्बल दोन दिवस भारतात होते. यावरून रशिया आणि भारत यांच्यात नाते नेमके काय आहे स्पष्ट झाले.

भारत दाैऱ्यानंतर रशियावरील दबाव अजून वाढण्याचे रिपोर्ट आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, G7 आणि युरोपियन युनियन अशा उपाययोजनांवर विचार करत आहेत, ज्यामुळे रशियाच्या तेल महसुलावर मागील निर्बंधांपेक्षा जास्त परिणाम होऊ शकतो. हा अत्यंत मोठा धक्का रशियाला म्हणावा लागेल. अगोदरच अमेरिकेने रशियाच्या दोन मुख्य तेल पुरवठा कंपन्यांवर बंदी घातली आहे. त्यामध्येच आता थेट G7 आणि युरोपियन युनियन मैदानात उतरले आहे.

रशियाच्या तेल व्यापारातून पाश्चात्य सागरी सेवा टँकर, विमा आणि शिपिंग पूर्णपणे काढून टाकणे आहे. जर त्याची अंमलबजावणी झाली तर जागतिक ऊर्जा राजकारणात मोठा बदल होऊ शकतो आणि त्याचा मोठा फटका बसू शकतो. युक्रेनसोबतच्या युद्धामध्ये रशियाने आपले नवीन मार्ग अगोदरच स्थापित केले आहेत. त्यांच्या तेलाची एक तृतीयांश  वाहतूक युरोपियन सागरी राष्ट्रांमधून जहाजांद्वारे केली जाते.

ग्रीस आणि सायप्रसमधील प्रचंड टँकर फ्लीट्स देखील भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहतूक करत आहेत. जर हे नवीन निर्बंध लागू झाले तर तेल पुरवठा पूर्णपणे बंद होईल. जर G7-EU ने संपूर्ण सागरी नेटवर्क बंद केले तर रशियाला समस्या निर्माण होऊ शकते आणि शैडो फ्लीटच्या संख्येत वाढ करावी लागेल. यावर रशियाची रणनीती सोपी आहे. कमी नियंत्रण असलेल्या ठिकाणी जहाजे पाठवा. म्हणूनच आशियाई देशांमध्ये जाणारी बहुतेक जहाजे पाश्चात्य विम्याशिवाय आणि सामायिक डेटाशिवाय चालतात. आता अनेक देश रशियाच्या विरोधात मैदानात येताना दिसत आहेत.