AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१४ मिनिटांसाठी तो मृत झाला होता, ११ हजार व्होल्ट वीजेच्या धक्क्यातूनही असा वाचला तरुण…

एखाद्या व्यक्तीला जर ११ हजार व्होल्टचा वीजेचा धक्का बसला तर त्याच्या शरीराची काय अवस्था होईल. आश्चर्य म्हणजे ही व्यक्ती वाचली, अनेक सर्जरी आणि २९ दिवस कोमात राहूनही ही व्यक्ती आज इतरांना संकटात हार मानू नका अशी प्रेरणा देत आहे.

१४ मिनिटांसाठी तो मृत झाला होता, ११ हजार व्होल्ट वीजेच्या धक्क्यातूनही असा वाचला तरुण...
11,000 VOLTS
| Updated on: Jun 09, 2026 | 10:59 PM
Share

स्क्रॅप मेटलच्या शोधात एका बंद पडलेल्या इमारतीत घुसलेल्या एका व्यक्तीने विचारही केला नव्हता की पुढे काही सेंकदात त्याचे जीवन बदलणार आहे. एका स्विचबोर्डाला स्पर्श करताच त्याला ११ हजार व्होल्टचा वीजेचा शॉक बसला, हा धमका इतका मोठा होता की तो अनेक फूट दूर जाऊन कोसळला. डॉक्टरांनी त्याला क्लिनिकली डेड घोषीत केले, तो २९ दिवस कोमात राहिला आणि त्याचे शरीर अर्धे वाईटरित्या भाजले होते. मात्र मृत्यूला टक्कर देऊन तो परतला…

‘द मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनच्या मिडिल्सब्रा येथे राहणाऱ्या डॅरेन हॅरिस यांच्यावर हा भयानक प्रसंग गुदरला होता. साल होते २०२०. त्यावेळी तिचे वय ३३ होते. डॅरेन एका जुन्या आणि रिकाम्या इमारतीत भंगार शोधण्यासाठी गेला होता. त्याला वाटले की इमारत तोडण्याआधी वीजेचे कनेक्शन कापले असेल. परंतू तसेच नव्हते.

स्विचला स्पर्श केल्याने सर्व बदलले…

डॅरेन याने जसा आपला हात एका स्विचबोर्डवर ठेवला तसे त्यांच्या शरीरात ११ हजार व्होल्टचा करंट गेला, ही सिस्टीम सुमारे ९८० घरे आणि ७८ फॅक्ट्री युनिट्सना वीज पुरवठा करणारा होती.

करंट इतका भयानक लागला की त्याच्या दोन्ही हातांची त्वचा आणि मांस जळून हाडापर्यंत पाहचले होते. धमाका झाल्यानंतर त्याच्या शक्तीने तो दूर जाऊन कोसळला. मात्र, तरीही कसे तर सावरत तो या इमारतीच्या बाहेर पडण्यात यशस्वी झाला.

२० दिवस कोमात,१४ मिनिटे मृत घोषीत

अपघातानंतर डॅरेन याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा त्याची प्रकृती नाजूक स्थितीत होती. डॉक्टरांच्या मते तो दोनदा मृत्यूचा जवळ पोहचला आणि एकदा तर १४ मिनिटे क्लिनिकली डेड झाला. डॅरेन यांनी सांगितले की मी २९ दिवसांपर्यंत कोमात होतो. माला तीन वेळा सेप्सिस झाला. माझ्या संपूर्ण शरीरात किडनी फेल्युअरसारखी स्थिती होती. मी दोनदा मेलो आणि १४ मिनिटे क्लिनिकली डेड डिक्लेअर झालो.

आरशात स्वत:ला पाहून घाबरलो –

सुमारे एक महिन्यानंतर डॅरेनला शुद्ध आली तेव्हा त्याला वाटले की कदाचित त्याचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलातील आरशात त्याने स्वत:ला पाहिले तर त्याला स्वत:ची भिती वाटली.

डॅरेन याने सांगितले की मी जागा झालो तेव्हा सर्वकाही अजब होते. मी दुखी होतो. रागात होता आणि धक्क्यात होतो. मी स्वत:ला आरशात पाहिले तर मला कळले की माझ्यासोबत काय झाले होते.

३३ सर्जरी, कान आणि नाक गमावले

डॅरेनला शरीराला वाचवण्यासाटी डॉक्टरांनी अनेक अवघड ऑपरेशन केले. त्याच्या पायाची त्वचा घेऊन चेहरा, पोट आणि हाताला पुन्हा तयार करण्यात आले. आतापर्यंत त्याच्यावर ३३ हून अधिक सर्जरी झाल्या आहेत. अपघातात त्याने त्याचे दोन्ही कान गमावले आणि नाकाचा भागही वाईटरित्या क्षतिग्रस्त झाला.

शारीरिक नाही तर , मानसिक वेदनाही झेलल्या

डॅरेन यांनी सांगितले की त्या अपघाताने त्याच्या शरीरालाच नव्हे तर मनाला देखील गंभीर नुकसान पोहचवले. त्याने सांगितले की अनेक वर्षांपर्यंत त्याला PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा सामना करावा लागला. अनेकदा जीवनाशी हार मानल्यासारखे वाटू लागले. अनेकदा नैराश्य आले आणि आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र,प्रत्येक वेळी त्याने स्वत:ला सावरल्याचे सांगितले.

आता डॅरेन याला त्याच्या चेहऱ्यावर रिकंस्ट्रक्शन सर्जरी करायची आहे. त्याचे म्हणणे आहे की त्याचा आत्मविश्वास त्यामुळे परत येईल आणि सामान्य जीवन जगता येईल. यासाठी त्याला पैशांची गरज आहे. यासाठी त्याने मोहिम सुरु केली असून १५ हजार पाऊंड जमले आहेत. आता १ लाख पाऊंड जमवण्याचा ध्येय आहे.

इतक्या वेदना आणि संघर्षानंतरही, डॅरेन हार मानायला तयार नाही. तो म्हणतो की, आपल्यावर आलेल्या परिस्थितीच्या माध्यमातून त्याला संकट किंवा कठीण परिस्थितीतून जाणाऱ्यांना धैर्य द्यायचे आहे. “अशा प्रकारचं आयुष्य मी माझ्या कट्टर शत्रूलाही मागू इच्छित नाही,” डॅरेन म्हणतो. “जर माझ्या कथेमुळे एका व्यक्तीला जरी धैर्य मिळालं, तर मला वाटेल की माझं दुसरं आयुष्य सार्थक झालं …

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार