विनयभंग करण्याचा प्रयत्न…याचा पेक्षा मोठी शिक्षा असूच शकत नाही

लंडनमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. अंडरकव्हर ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलीस अधिकार्‍यांना लक्षात हा प्रकार आला. त्याला गाडीतून ओढत नेऊन अटक केली. त्यानंतर मोठी शिक्षा त्याला करण्यात आली.

विनयभंग करण्याचा प्रयत्न...याचा पेक्षा मोठी शिक्षा असूच शकत नाही
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 5:02 PM

लंडन : आपल्याकडे अत्याचाराची अनेक घटना उघड होत असतात. त्यातील आरोपी पकडले जातात. मग त्या आरोपींना न्यायालयात शिक्षा देण्यासाठी मोठा कालापव्यय होतो. न्यायालयातून उच्च न्यायालयात, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात असा खटला सुरु असतो. त्यामध्ये काही वर्षे निघून जातात. फाशीची शिक्षा झाली तर मग दयेसाठी अर्ज केला जातो. त्यावर निर्णय होण्यासही अनेक वर्षे जातात. देशभर प्रचंड गाजलेल्या दिल्लीतील निर्भया प्रकरणात अशीच अनेक वर्षे गेली. परंतु लंडनमधील पोलीस आणि न्यायालयाने जे केले, त्याला बघून सलामच करावा…विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जन्माची अद्दल घडवलीय.

नेमके काय झाले

गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर रोजी एका 13 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. मध्य लंडनमधील ग्रीन पार्क स्टेशनवर एका 13 वर्षांच्या मुलगी आणि तिचे कुटुंब लंडन अंडरग्राउंड ट्रेनमधून जात होते. त्यावेळी अब्दुलरी झाक अली हर्सी (वय 32) याने याने त्या 13 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याच्या प्रयत्न केला. पिकॅडिली लाईनच्या रेल्वेत डब्यात दाराजवळ उभा असलेला अब्दुलरीझाक अली हर्सी असा प्रकार करत असल्याचे अंडरकव्हर ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलिस अधिकार्‍यांना लक्षात आले.

हे सुद्धा वाचा

आरोपीला केली अटक 

पोलीस अधिकाऱ्यांनी अब्दुलरीझाक अली हर्सी याला पकडले. पुढील स्टेशन लिसेस्टर स्क्वेअर येताच त्याला गाडीतून ओढत नेऊन अटक केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. हा खटला इनर लंडन क्राउन कोर्टासमोर चालला.

18 महिन्यांचा तुरुंगवास अन् दंड

हर्सीला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली 18 महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. तसेच पुढील दहा वर्षांपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही महिलेच्या जवळ, मागे किंवा पुढे उभे राहण्यास बंदी घातली आहे. तसेच पीडितेला 187 पौंड रक्कम देण्याचे आदेश दिले.

कसा पकडला आरोपी

निरीक्षक शेरॉन टर्नर म्हणाले की, अब्दुलरिझाक अली हर्सीसारखे गुन्हे करण्याच्या विचारात असणाऱ्या गुन्हेगारांना ओळखण्यासाठी साध्या कपड्यातील पोलिसांना विशेष प्रशिक्षित केले गेले आहे. या प्रकरणात आमच्या अधिकार्‍यांनी त्वरीत हस्तक्षेप करेपर्यंत पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना काय घडत आहे, हे कळलेही नव्हते. आमच्याकडे रात्रंदिवस अंडरग्राउंडमध्ये अशाप्रकारे साध्या कपड्यांचे गस्त चालते. यामुळेच प्रवाशांना आपण सुरक्षित आहोत याची खात्री वाटेल.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.