AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेजरप्रमाणे मोबाइल हॅक करु शकतात का? दोघांमधील तंत्रज्ञानात काय आहे फरक…

Hezbollah terrorists Cyber attack: पेजरच्या तुलनेत मोबाइल प्रणाली प्रगत आणि आधुनिक आहे. पेजरपेक्षा मोबाईल हॅक करणे जास्त कठीण आहे. फोन हॅक करणे हे त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीम आणि सिक्युरिटी सिस्टमवरही अवलंबून असते. Android पेक्षा iOS अधिक सुरक्षित मानले जाते.

पेजरप्रमाणे मोबाइल हॅक करु शकतात का? दोघांमधील तंत्रज्ञानात काय आहे फरक...
Hezbollah terrorists Cyber attack
| Updated on: Sep 18, 2024 | 8:25 AM
Share

लेबनॉनमध्ये मंगळवारी हिजबुल्लाहच्या लोकांच्या पेजरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात चार हजारापेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. पेजरच्या माध्यमातून स्फोट घडवून आणण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. या तंत्रज्ञानामागे इस्त्रायल असल्याचे म्हटले जात आहे. परंतु यासंदर्भात अद्याप इस्लाइलकडून काहीच वक्तव्य जारी करण्यात आले नाही. इस्त्रायली हल्ले टाळण्यासाठी हिजबुल्लाचे अतिरेकी पेजरचा वापर करत होते. पेजर हॅक करता येत नाही, असा त्यांचा समज होता. परंतु आता पेजर हॅक करुन हे स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मग काय पेजरप्रमाणे मोबाईलच्या माध्यामातून स्फोट घडवून आणणे शक्य आहे का?

पेजर आहे तरी काय?

पेजर हे असे गॅझेट आहे, ज्याच्या माध्यमातून मेसेज पाठवणे आणि मेसेज रिसीव्ह होणे शक्य आहे. मोबाईल येण्यापूर्वी पेजर आले होते. त्यावेळी हे गॅझेट चांगलेच लोकप्रिय झाले होते. 1990 च्या दशकात अनेकांकडून पेजरचा वापर होत होता. विशेषत: डॉक्टर, उद्योजक आणि आपत्कालीन सेवेत असणाऱ्या व्यक्ती या तंत्रज्ञानाचा वापर करत होते. ही सेवा त्या काळात महागही होती. पेजर डिव्हाइस, रेडियो सिग्नलच्या माध्यमातून मेसेज पाठवतो आणि रिसीव्ह करतो.

पेजर हॅक करता येतो का?

पेजरची सुरक्षा प्रणाली जास्त मजबूत नाही. पेजर सिस्टीम एनक्रिप्टेड नसते. यामुळे त्यात असलेला डेटा कॅप्चर करून हॅक केला जाऊ शकतो. यानंतर हॅकर्स त्यांच्या कमांड देऊ शकतात. हिजबुल्लाहचे अतिरेकी आपले लोकेशन समजू नये म्हणून पेजरचा वापर करत होते. परंतु आता तेच पेजर त्यांच्यासाठी धोक्याचे ठरले आहे.

मोबाईल हॅक करता येतो का?

पेजरच्या तुलनेत मोबाइल प्रणाली प्रगत आणि आधुनिक आहे. पेजरपेक्षा मोबाईल हॅक करणे जास्त कठीण आहे. फोन हॅक करणे हे त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीम आणि सिक्युरिटी सिस्टमवरही अवलंबून असते. Android पेक्षा iOS अधिक सुरक्षित मानले जाते. पेजरपेक्षा मोबाईल जास्त सुरक्षित आहे. परंतु मोबाईल हॅक होणारच नाही, असे म्हणणे धाडसाचे आहे.

जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.