AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होमुर्ज संकट…आखाती देशाचा प्लॅन B, असा केला जुगाड की इराण पण हैराण…ट्रम्प यांनी वाजवल्या टाळ्या

Gulf Countries on Hormuz Crisis: होर्मुज संकट अजूनही निवळलेले नाही. अमेरिका आणि इराणमध्ये आण्विक करार लांबला आहे. दोन्ही देशांच्या आडमुठेपणामुळे जग वेठीस धरल्या गेले आहे. महागाई वाढली आहे. त्यावर आता आखाती देशांनी प्लॅन B तयार केला आहे. त्यामुळे इराणचे धाबे दणाणले आहे.

होमुर्ज संकट...आखाती देशाचा प्लॅन B, असा केला जुगाड की इराण पण हैराण...ट्रम्प यांनी वाजवल्या टाळ्या
आखाती देश, प्लॅन बी आणि इराणचा थयथयाटImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 14, 2026 | 1:56 PM
Share

UAE-Saudi Arab-Oman Road access to supply: युद्धबंदीनंतरही इराणने होर्मुज समुद्रधुनी पूर्णपणे मोकळा केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण जगातील मालवाहतुकीला मोठा अडथळा आला आहे. अमेरिका आणि इराण या देशात मोठा तणाव आहे. दोन्ही देशांच्या आडमुठ्या धोरणांचा फटका जगाला बसला आहे. अमेरिका आणि इराणचे घोडे आण्विक करारावर अडले आहे. जगाची नाकाबंदी करण्याचा इराणचा डाव अखेर आखाती देशांनीच मोडून काढला आहे. सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि ओमान या तीन देशांनी मिळून प्लॅन बी तयार केला. या तीनही देशांनी मिळून एक मोठा रस्ता तयार केला आहे. होर्मुजमुळे जो पुरवठा थांबला होता, तो या रस्त्याच्या मदतीने सुरळीत करण्यात आला आहे.

होर्मुजला सुवेज कालव्याचा पर्याय

वॉल स्ट्रीट जर्नलने या प्लॅन बीची कौतुक कहाणी छापली आहे. होर्मुजला पर्याय देण्यात हे तीनही आखाती देश यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रणरणत्या वाळवंटातून रोज 3500 मालवाहक ट्रकांच्या खेपा जात आहेत. हे ट्रक युएईमधून माल घेऊन ओमानाच्या मार्गे सौदी अरबमध्ये पोहचत आहेत. तिथून हे मालवाहक जहाजं ओमानची खाडी आणि सुवेझ कालव्यातून जगभरात माल पोहचवला जात आहे.

या मार्गाचे जगभरात कौतुक

वॉल स्ट्रीटच्या मते संयुक्त अरब अमिरातमधील फजेराह, खोर फाक्कन मालवाहू बंदरातून माल ट्रकमध्ये टाकण्यात येतो. ट्रक ओमान इंटरलिंकच्या मार्गे सौदी अरबमधील लाल सागराच्या बंदरापर्यंत पोहचतो. त्यानंतर हा जहाजांमार्गे हा माल जगभरात पोहचवल्या जातो. याच मार्गाचा वापर करून सौदी अरब, कुवेत, ओमान या देशाचे ट्रक सुद्धा जात आहेत. एका अंदाजानुसार, प्रत्येक दिवशी 3500 ट्रक या मार्गाचा बेधडक वापर करत आहेत. या ट्रकमध्ये गरजेचे सामान असते. खाद्य पदार्थ, कृषी उत्पादन आणि इतर मालाचा पुरवठा या मार्गाने करण्यात येत आहे. रस्त्याचा हा प्रवास सध्या महागडा असला तरी पूर्णपणे सुरक्षित असून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्याचे काम यामाध्यमातून करण्यात येत आहे.

आखाती देशांतील इंधनाला हवा नवीन पर्याय

आखातील देश सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार, इराक हे त्यांचे कच्चे तेल, नैसर्गिक वायू होर्मुज समुद्रधुनीतून पाठवत होते. पण इराणने तिथे अनेक बंधन घातल्याने आणि कर आकारल्याने सध्या हा जलमार्ग बंद आहे. त्याचा फटका आखाती देशांना बसत आहे. त्यावर पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. सौदी अरबने पाईपलाईनच्या मार्गे त्यावर तोडगा काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

होर्मुजच्या मार्गे जगभरात एकूण 25 टक्के तेल आणि गॅसचा पुरवठा करण्यात येतो. पण इराण युद्धामुळे गेल्या 2 महिन्यांपासून हा रस्ता बंद आहे 34 किमी रुंद असलेल्या या समुद्रातील रस्त्याने जगातील 3 खंड जोडले जातात. त्यावर पूर्वीपासून इराणचे वर्चस्व आहे. इस्लामिक क्रांतीनंतर इराणने होर्मुजवरील नियंत्रण अधिक मजबूत केले आहे.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी