AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel Tension : 1500 किमी अंतर, तीन देश, इस्रायलसमोर मोठं चॅलेंज, 350 मिसाइल्सचा बदला कसा घेणार?

Iran Israel Tension : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सध्या अपमानाच्या आगीत होरपळतायत. इराणने इस्रायलवर 350 मिसाइल्स, ड्रोन्स डागण्याच धाडस केलय. काहीही करुन त्यांना बदला घ्यायचा आहे. पण त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. इस्रायल ते पार कसे करणार? हेच त्यांच्यासमोरच सर्वात मोठ चॅलेंज आहे.

Iran Israel Tension : 1500 किमी अंतर, तीन देश, इस्रायलसमोर मोठं चॅलेंज, 350 मिसाइल्सचा बदला कसा घेणार?
Israel vs Iran
| Updated on: Apr 18, 2024 | 12:30 PM
Share

इराणच्या मिसाइल हल्ल्याला कधी आणि कसं उत्तर द्यायचं, यावर आज गुरुवारी अंतिम निर्णय होऊ शकतो. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायली वॉर कॅबिनेट आणि सुरक्षा कॅबिनेट या संबंधी बैठक करणार आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट केलय की, सहकारी देशांच सल्ला काहीही असो, पण अंतिम निर्णय इस्रायल स्वत: घेईल. इस्रायल दौऱ्यावर आलेले ब्रिटन आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना आपल मत कळवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेविड कॅमरुन यांनी इस्रायलला संयम बाळगण्यास सांगितलं आहे.

13-14 एप्रिलला इराणने जवळपास 350 मिसाइल आणि ड्रोन्स इस्रायलच्या दिशेने डागले. इस्रायली सरकार आणि सैन्यान या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलमोर दुहेरी समस्या आहे. इराणवर हल्ल्यासाठी अमेरिका हिरवा कंदिल दाखवत नाहीय. हिब्रू यूनिवर्सिटीच्या एका ओपनियन पोलनुसार, इस्रायलचे मित्र देश तयार नसतील, तर इस्रायलने इराणवर हल्ला करु नये.

अधिक घातक उत्तर द्याव लागेल

इस्रायलला काहीही करुन आपल्यावर झालेल्या हल्ल्याला उत्तर द्यायच आहे. इराणवर हल्ल्यासाठी इस्रायलला अमेरिका आणि मित्र देशांकडून मदतीची गरज भासेल. इराण आणि इस्रायलमध्ये 1500 किलोमीटरच अंतर आहे. हवाई हल्ल्यासाठी इस्रायलला जॉर्डन, इराक आणि सीरिया या देशांच्या हवाई क्षेत्रातून जावं लागेल. इराणने 350 मिसाइल्स, ड्रोन डागली. इस्रायलला त्यापेक्षा अधिक घातक उत्तर द्याव लागेल.

किती देशांना इच्छा नसताना युद्धात उतरावं लागेल

इराणवर अचूक वार करण्यासाठी इस्रायलला मध्य पूर्वेतील अमेरिकेचे सैन्य तळ, अमेरिका आणि मित्र देशांच्या एअरक्राफ्ट कॅरिअरची गरज भासेल. इस्रायली सैन्याने हल्ल्यासाठी अनेक पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत. इराणच समर्थन प्राप्त असलेल्या हिजबुल्ला आणि हमासवर इस्रायली हल्ले सुरु आहेत. पण ते इराणला प्रत्युत्तर मानता येणार नाही. इस्रायलच्या हल्ल्याच समर्थन केल्यास इराण भडकेल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ला करण्यासाठी त्यांना कारण मिळेल. त्यामुळे इच्छा नसतानाही जॉर्डन, सौदी अरेबिया, कतर, इराक या देशात युद्धा उतरावं लागेल.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.