AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदी दौऱ्यावर असलेल्या नॉर्वेमध्ये किती हिंदू राहतात? कोणत्या धर्माची सर्वाधिक लोकसंख्या?

Norway Hindus : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नॉर्वेबाबत जगभरात उत्सुकता वाढली असून, त्या देशातील धार्मिक रचना आणि हिंदू लोकसंख्येबाबतही अनेकांना जाणून घ्यायचे आहे.

PM मोदी दौऱ्यावर असलेल्या नॉर्वेमध्ये किती हिंदू राहतात? कोणत्या धर्माची सर्वाधिक लोकसंख्या?
Norway HinduImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 18, 2026 | 8:42 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. ते 19 मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे नॉर्वेबाबत जगभरात उत्सुकता वाढली असून, त्या देशातील धार्मिक रचना आणि हिंदू लोकसंख्येबाबतही अनेकांना जाणून घ्यायचे आहे. आज आपण या देशात किती हिंदू लोक आहेत? तसेच या देशात कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नॉर्वेमध्ये किती हिंदू आहेत?

समोर आलेल्या धार्मिक आणि लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार, सध्या नॉर्वेमध्ये सुमारे 14,320 हिंदू राहतात. ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 0.26 टक्के आहे. नॉर्वेमध्ये हिंदू धर्म अजूनही अल्पसंख्याक धर्म मानला जात असला, तरी हिंदू समुदायाने तिथे स्वतःची वेगळी सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख निर्माण केली आहे. नॉर्वेमधील बहुतांश हिंदू हे दक्षिण आशियाई समुदायांतील आहेत. यात श्रीलंकन तमिळ आणि भारतीय नागरिकांचा यात मोठा वाटा आहे.

1980 आणि 1990 च्या दशकात श्रीलंकेतील यादवी युद्धादरम्यान अनेक तमिळ निर्वासित सुरक्षिततेच्या शोधात युरोपियन देशांमध्ये गेले होते. त्यापैकी अनेकांनी नॉर्वेमध्ये स्थायिक होणे पसंत केले. गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांमुळे नॉर्वेमधील हिंदू लोकसंख्या वाढली आहे.

नॉर्वेमधील सर्वात मोठा धर्म कोणता?

नॉर्वेमध्ये ख्रिश्चन धर्म हा अजूनही प्रमुख धर्म आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशातील सुमारे 68.5 ते 76 टक्के लोक स्वतःला ख्रिश्चन मानतात. देशातील बहुतांश ख्रिश्चन नागरिक चर्च ऑफ नॉर्वेशी शी संबंधित आहेत. गेल्या काही वर्षांत नॉर्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर असे लोक वाढले आहेत, जे स्वतःला कोणत्याही धर्माशी जोडलेले मानत नाहीत. सध्या देशातील सुमारे 18 ते 27 टक्के लोक नास्तिक किंवा कोणत्याही औपचारिक धर्माचे पालन न करणाऱ्या गटात मोडतात.

इस्लाम हा सर्वात मोठा गैर-ख्रिश्चन धर्म

इस्लान हा नॉर्वेमधील दुसऱ्या क्रमांकाचा आणि सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 3.4 ते 3.7 टक्के लोक मुस्लिम आहेत. त्यांची संख्या 1 लाख 97 हजारांहून अधिक आहे. हे लोक आशियासह इतर देशांमधून या देशात स्थायिक झाले आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...