AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर महाशक्तीला सुद्धा सोडणार नाही, इराणने ललकारले, दिली अमेरिकन तळांवर हल्ला करण्याची धमकी

Iran-Israel Attack : इराणने रविवारी इस्त्राईलवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. अर्थात इस्त्राईलच्या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीमुळे त्यातील अनेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट झाली. अमेरिकेने इस्त्राईलला मोठी रसद पुरवली आहे. इराणविरोधात अमेरिकेने इस्त्राईलला पाठिंबा दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा तेहराने दिला आहे.

तर महाशक्तीला सुद्धा सोडणार नाही, इराणने ललकारले, दिली अमेरिकन तळांवर हल्ला करण्याची धमकी
तर अमेरिकेला पण सोडणार नाही
| Updated on: Apr 14, 2024 | 4:37 PM
Share

रविवारी इराणने इस्त्राईलवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. अर्थात इस्त्राईलच्या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीने त्यातील कित्येक हवेतच नष्ट झाले. इराणने क्षेपणास्त्रांनी लक्ष्य भेदल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी इस्त्राईलच्या पाठिशी असलेल्या अमेरिकेला पण गंभीर इशारा दिला आहे. इराणविरोधात अमेरिकेने इस्त्राईलला बळ दिल्यास अमेरिकेन तळांवर हल्ल्याचा इशारा इराणने दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून इराण आणि अमेरिकेत वारंवार खटके उडत आहेत. मागील वर्षी इराणने अमेरिकेला ब्लॅकमेल केल्याचा दावा पण काही युद्धतज्ज्ञांनी केला होता. ईसीसीविरोधातील युद्ध सामूग्री आणि मोठी रसद हिजबुल्लाने लांबविल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.

अमेरिका इस्त्राईलच्या पाठिशी

अमेरिकेने इस्त्राईलला यापूर्वीच या हल्ल्यासंदर्भात अलर्ट दिला होता. इराणच्या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. तर मध्य-पूर्वेत शांतता ठेवण्यासाठी आणि इस्त्राईलचे सौर्वभौमत्व टिकविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

इराणने हल्ला करण्याचे कारण काय

दमास्कस दूतावासावर इस्त्राईलने हल्ला केला. त्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या परदेशातील कुड्स फोर्सच्या वरिष्ठ कमांडरसह अनेक अधिकारी मारल्या गेल्याचा आरोप इराणने केला. 1 एप्रिल रोजी हा हल्ला झाला होता. इराणचे सर्वात मोठे नेते अयातुल्ला अली खामेनीने यांनी इस्त्राईलवरील हल्ल्याचे समर्थन केले. आमच्या अधिकाऱ्यांना हवाई हल्ल्यात मारणाऱ्या इस्त्राईलला आम्ही धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला.

तर तात्काळ प्रतिक्रिया देऊ

इराणच्या रिव्होल्यूशनरी आर्म्ड फोर्सने इराणच्या हितरक्षणात हस्तक्षेप केल्यास, आडवे आल्यास तात्काळ प्रतिक्रिया देण्यात येईल अशी धमकी अमेरिकेला दिली आहे. अमेरिकेने इराणविरोधात इस्त्राईलला पाठिंबा न देण्याचा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे युद्ध भडकण्याची भीती आहे.

शांततेसाठी प्रयत्न करा

भारताने मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. इराण आणि इस्त्राईलमधील ताज्या तणावावर दोन्ही देशांनी हिंसेचा मार्ग सोडून लागलीच चर्चा करावी, अशी आग्रही भूमिक भारताने घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याविषयीचे आवाहन केले आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.