Pakistan Political Crisis : हेलिकॉप्टर आलं आणि इम्रान खान यांचा गेम पलटला, बाजवांचा बळी देण्याचा प्रयत्न हुकला

त्याआधी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा (Genral kamar Bajwa) यांना हटवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यांना हटवून खुर्ची वाचवण्याच्या तयारीत होते इम्रान खान.

Pakistan Political Crisis : हेलिकॉप्टर आलं आणि इम्रान खान यांचा गेम पलटला, बाजवांचा बळी देण्याचा प्रयत्न हुकला
इम्रान खान यांचा गेम फसलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 3:33 PM

मुंबई : क्रिकेट ते पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan Political Crisis) असा इम्रान खान (Imran Khan) यांचा प्रवास राहिला. मात्र बहुमत आपल्याकडे नाही हे माहिती असूनही त्यांनी सत्तेचा गेम जरा जास्तच खेचला. सन्मानाने राजीनामा देऊन गेले नाही तर त्यांची हाकलपट्टी करण्यात आली. मात्र त्याआधी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा (Genral kamar Bajwa) यांना हटवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. त्यांना हटवून खुर्ची वाचवण्याच्या तयारीत होते इम्रान खान. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला कारण संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली नाही. मीडिया रिपोर्टमध्ये बाजवा यांचे नाव घेण्यात आले नाही. मात्र इम्रान खान यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी खास यांना भेटण्यासाठी हेलिकॉप्टरमधून आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

रात्री भेटीला पोहोचलेले अधिकारी कोण?

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार बाजवा आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची शनिवारी उशिरा खान यांच्याशी बैठक झाली. त्यानंतर इम्रान खान यांची नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे हकालपट्टी करण्यात आली. पाकिस्तनी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री दोन लोक हेलिकॉप्टरने पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी सुमारे 15 मिनिटे त्यांनी इम्रान खान यांची वैयक्तिक भेट घेतली. बैठकीच्या तासाभरापूर्वी इम्रान खान यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी करून इतर कोणाला नेमण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.

बाजवांना हटवल्यास काय झालं असतं?

पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार या हेलिकॉप्टरमधून नवनियुक्त अधिकारी येतील अशी अपेक्षा इम्रान खान यांना लागली होती. बाजवा यांची हकालपट्टी केल्यास सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या नॅशनल असेंब्लीमधील अविश्वास प्रस्तावावर मात करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा इम्रान खान यांनी व्यक्त केली होती. मात्र या हेलिकॉप्टरमधून बाजवा आणि जनरल नदीम अंजुम हेच आल्याने इम्रान खान यांची पुरती निशारा झाली.

Pakistan Political Crisis : पाकिस्तानमध्ये सत्तेचा ‘एप्रिल फुल’, याच महिन्यात सर्वाधिक सरकारे कोसळली; पाहा विशेष रिपोर्ट

Pakistan Political Crisis : इम्रान खान आऊट होताच निकटवर्तीयांवर कारवाई, प्रवक्त्याच्या घरावर रात्रीपासून छापेमारी

Pakistan Political Crisis : अखेर इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हाकलपट्टी, शहबाज शरीफ यांचा मार्ग मोकळा

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.