AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : त्या रात्री अणूबॉम्ब टाकलाय का, हे ओळखण्यासाठी आमच्याकडे फक्त…पाकिस्तानातून पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान विरोधात जी कारवाई केली, त्या बाबत आता पाकिस्तानातून एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. महत्त्वाच म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह हे या विषयी बोलले आहेत. त्या चार रात्री पाकिस्तानची काय अवस्था झालेली, ते पहिल्यांदाच समोर आलय.

Operation Sindoor : त्या रात्री अणूबॉम्ब टाकलाय का, हे ओळखण्यासाठी आमच्याकडे फक्त...पाकिस्तानातून पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
rana sanaullah
| Updated on: Jul 04, 2025 | 11:05 AM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले. या घटनेने सगळ्या देशाला हादरवून सोडलं. देशभरात पाकिस्तान विरोधात आक्रोश वाढलेला. या दहशतवादी हल्ल्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. त्या अंतर्गत भारतीय सैन्य दलांनी दहशतवादी तळ आणि पाकिस्तानच्या सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान हादरुन गेला. भारताकडून झालेल्या कारवाईने पाकिस्तानी सैन्य घाबरलं. पाकिस्तानी सैन्याला हे कळतच नव्हतं की, भारताच्या या घातक हल्ल्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं. याचा खुलासा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी केलाय.

“भारताने जेव्हा ब्रह्मोस क्रूज मिसाइल डागलीत. त्यावेळी येणाऱ्या मिसाइलमध्ये अणवस्त्र आहेत कि, नाहीत हे ओळखण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडे फक्त 30 ते 45 सेकंदाचा वेळ होता. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान अणवस्त्र युद्धाचा धोका वाढला होता” असं राणा सनाउल्लाह म्हणाले. हा सर्व संघर्ष पहलगाममध्ये निर्दोष भारतीय पर्यटकांची हत्या केल्यानंतर सुरु झाला.

खूपच धोकादायक स्थिती

सनाउल्लाह एका पाकिस्तानी न्यूज चॅनलवर बोलत होते. “भारताने जेव्हा नूर खान एअरबेसवर ब्रह्मोस मिसाइल डागली. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याकडे येणाऱ्या मिसाइलमध्ये अणवस्त्र आहे की, नाही? हे ओळखण्यासाठी फक्त 30 ते 45 सेकंदाचा वेळ होता. इतक्या कमी वेळात कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामुळे खूपच धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते” असं सनाउल्लाह म्हणाले.

मी असं म्हणत नाहीय की….

“मी असं म्हणत नाहीय की, भारताने अणवस्त्राचा वापर न करुन काही चांगलं केलय. पण पाकिस्तानने काही चुकीचा समज करुन घेतला असता, आपल्यावर अणवस्त्र हल्ला झालाय, तर ही जागतिक अणवस्त्र युद्धाची सुरुवात ठरली असती” असं राणा सनाउल्लाह म्हणाले.

भारताने कशाला टार्गेट केलं?

रावळपिंडी चकलाला येथे पाकिस्तानचा नूर खान एअरबेस आहे. पाकिस्तानी एअर फोर्सचा हा प्रमुख बेस मानला जातो. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केलं. या मिशनमध्ये रनवे, हँगर आणि महत्त्वपूर्ण इमारतींना लक्ष्य करण्यात आलं. यामध्ये पाकिस्तानच मोठ नुकसान झालं. हा त्यांच्यासाठी झटका आहे. सॅटलाइट फोटोंमधून सरगोधा, नूर खान (चकलाला), भोलारी, जैकबाबाद, सुक्कुर आणि रहीम यार खान सारख्या प्रमुख एअरबेसेसवर झालेलं मोठ नुकसान दिसून आलं.

पाकिस्तानचा तो एअरबेस भारताने पहिल्यांदा टार्गेट केलेला नाही

भारताने पहिल्यांदाच नूर खान एअरबेसला टार्गेट केलं नाही. 1971 च्या युद्धातही इंडियन एअर फोर्सच्या 20 स्क्वाड्रनने आपल्या हॉकर हंटर विमानातून या एअरबसेवर जोरदार हल्ला केला होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे तळ नष्ट केले.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.