मोठा बातमी! भारत आणि चीन गोगरा हाईट्सवरून सैन्य माघारी घेणार, चर्चेच्या 12 व्या फेरीत दोन्ही देशांमध्ये एकमत

भारत आणि चीनदरम्यान (India China LAC Issue) लष्करी चर्चेची 12 वी फेरी नुकतीच पार पडली. या चर्चेत पेट्रोल पॉईंट 17A म्हणजेच गोगरा पॉईंटपासून (Gogra Point) आपापलं सैन्य माघारी घेण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं असल्याचं कळतंय. त्यामुळे लडाख (Ladakh) सीमेवरचा तणाव काहीसा निवळण्याची चिन्हं दिसत आहेत. भारत आणि चीनदरम्यान मागच्या अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. दोन्ही […]

मोठा बातमी! भारत आणि चीन गोगरा हाईट्सवरून सैन्य माघारी घेणार, चर्चेच्या 12 व्या फेरीत दोन्ही देशांमध्ये एकमत
भारत-चीन सीमावाद
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 6:32 PM

भारत आणि चीनदरम्यान (India China LAC Issue) लष्करी चर्चेची 12 वी फेरी नुकतीच पार पडली. या चर्चेत पेट्रोल पॉईंट 17A म्हणजेच गोगरा पॉईंटपासून (Gogra Point) आपापलं सैन्य माघारी घेण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झालं असल्याचं कळतंय. त्यामुळे लडाख (Ladakh) सीमेवरचा तणाव काहीसा निवळण्याची चिन्हं दिसत आहेत. भारत आणि चीनदरम्यान मागच्या अनेक महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. दोन्ही सैन्यांनी सीमारेषेजवळ (LAC) आपापलं सैन्य तैनात केलं आहे. अशा परिस्थितीत परिस्थितीत निवळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावर सातत्यानं बैठका होत आहेत. (India and China will withdraw Army troops from Gogra Heights after the 12th round of Corps Commander Level Meeting)

याआधी दोन्ही सैन्यामध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या. मात्र, त्यात विशेष तोडगा निघू शकला नव्हता. आता 12 व्या फेरीत दोन्ही देशांनी आपापलं सैन्य माघारी घेण्याचं ठरवलं आहे. सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी 31 जुलैला चुशुल-मोल्दो (Chushul-Moldo) सीमेवर चर्चेची 12 वी फेरी पार पडली. त्यानंतर 2 ऑगस्टला एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

हॉटस्प्रिंग, गोगरा आणि डेपसांगमधून सैन्य घेणार माघारी

सुत्रांच्या माहितीनुसार सैन्य माघारी बोलावण्यावर लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. दोन्ही देश पीपी-15 (हॉटस्प्रिंग) आणि डेपसांग मैदानांसहित इतर मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवतील. चर्चेच्या 12 व्या फेरीत भारत-चीन सीमारेषेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. प्रोटोकॉलनुसार हे मुद्दे लवकरात लवकर सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेदरम्यान तयारी दर्शवली. चर्चेच्या 11 व्या फेरीदरम्यान चीनने हॉटस्प्रिंग, गोगरा आणि डेपसांग परिसरातून आपलं सैन्य माघारी घेण्यास नकार दिला होता. मात्र, भारतानं आक्रमकपणे बाजू लावून धरल्यानंतर चीनी ड्रॅगन काहीसा नरमलाय. अखेर 12 व्या फेरीत भारत आणि चीनमध्ये हॉट स्प्रिंग्स, डेपसांग आणि गोगरा भागातून सैन्य घेण्याचं ठरलं आहे.

गलवान खोऱ्यात झाला होता रक्तरंजित संघर्ष

गेल्यावर्षी 15 जूनला भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले होते. पण भारताचे 20 जवान मृत्युमुखी पडले होते. तब्बल 45 वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये रक्तपात घडला होता. तर अमेरिका आणि रशियाच्या वृत्तसंस्थांनी या संघर्षात चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता. (India and China will withdraw Army troops from Gogra Heights after the 12th round of Corps Commander Level Meeting)

इतर बातम्या :

“आधी गोळ्या झाडल्या, मग फरफटत नेलं आणि गाडीखाली चिरडलं”, पत्रकार दानिश सिद्दीकींच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

Exclusive: पाकिस्तानची पोलखोल, TV9 च्या मुलाखतीत अफगाणिस्तानमधील तालिबान्याचे धक्कादायक खुलासे

आफ्रिकेत नायजर सैन्यावर दहशतवादी हल्ला, 15 सैनिकांचा मृत्यू, अनेक जवान बेपत्ता

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.