‘भारत आणि पंतप्रधान मोदी माझ्या खूप जवळचे, आमच्यात चांगली मैत्री, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की…

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी म्हणाले की ते भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खूप जवळचे आहेत. अमेरिकेचे हे वक्तव्य भारताच्या रशियाशी असलेल्या इंधन व्यापारावर त्यांनी केलेल्या जोरदार टीकेनंतर आले आहे.

भारत आणि पंतप्रधान मोदी माझ्या खूप जवळचे, आमच्यात चांगली मैत्री, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की...
| Updated on: Sep 19, 2025 | 5:50 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या दोऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की त्यांचे भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळकीचे नाते आहे. ट्रम्प यावेळी म्हणाले की, ‘मी भारत आणि मोदी यांच्या खूप जवळ आहे आणि आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. ‘

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी केलेले हे वक्तव्य भारताचा रशियन इंधन व्यापारावरुन वारंवार केलेल्या तिखट वक्तव्यानंतर आले आहे. यापूर्वी 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर असे वाटत होते की ट्रम्प भारतापासून दूर होत आहेत.परंतू त्यांच्या ताज्या वक्तव्याने पुन्हा एकदा पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक संबंधांना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

यूरोपीय देशांना दिला इशारा

या दरम्यान ट्रम्प यांनी रशियाकडून युरोपीयन देश खरेदी करत असलेल्या इंधनावर सागितले की आम्हाला कळले आहे की युरोपीय देश रशियाकडून इंधन खरेदी करत आहेत आणि जसे तुम्हाला माहिती आहे की मी भारताच्या खूपच जवळचा आहे. मी भारताच्या पंतप्रधानांच्या खूप जवळचा आहे. मी त्यांच्याशी गेल्यावेळी बोललो, त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्या चांगले संबंध आहेत. त्यांनी देखील एक सुंदर वक्तव्य केले.परंतू तुम्ही जानता मी त्यांच्यावर निर्बंध लावलेले आहेत.

ट्रम्प म्हणाले की चीन या समयी अमेरिकेला खूप जास्त टॅरिफ लावत आहे.परंतू मी आणखी काही गोष्टी, करण्यास तयार आहे, पण तेव्हा नाही जेव्हा ते लोक, ज्यांच्यासाठी मी लढत आहे,ते रशियाकडून इंधन खरेदी करत असतील. जर इंधनाचे दर कमी झाले तर, रशिया सहज सामंजस्य करेल आणि तेलाच्या किंमती खूप कमी होतील.

३० नोव्हेंबरनंतर कमी होऊ शकतो टॅरिफ

भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान व्यापाराबाबत तणाव जारी असताना आता आशेचे किरण नजर येत आहेत. अमेरिका लवकरच भारतावर लावलेले टॅरिफ मागे घेऊ शकतो. गुरुवारी भारताचे चीफ इकॉनॉमिक एडव्हायझर व्ही.अनंत नागेश्वरन यांनी सांगितले की काही आयातांवर लावलेला दंडात्मक शुल्क ३० नोव्हेंबरनंतर मागे घेतला जाईल. जर असे झाले तर, दोन्ही देशांचे संबंध पुन्हा सुरळीत होऊ शकतील.