India-Bangladesh Border : भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव, दोन्ही देशांच सैन्य का आमने-सामने आलं?
India-Bangladesh Border : पाकिस्ताननंतर आता भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणाव निर्माण झाल्याच वृत्त आहे. दोन्ही देशांच सैन्य आमने-सामने आलं. ही घटना बॉर्डरच्या पिलर नंबर 1067 जवळ झाली.

भारत-बांग्लादेश बॉर्डरवर पुन्हा एकदा तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. ताजी घटना मंगळवार सकाळची आहे. आसामची सीमा बांग्लादेशाला लागून आहे. तिथे दोन वेगवेगळ्या भागात कुरीग्रामच्या बोराइबारी आणि आसमच्या मनकाछार येथे कथितरित्या भारताची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बांग्लादेश बॉर्डर गार्ड आमने-सामने आले होते. मंगळवारी बांग्लादेशच्या कुरीग्राम जिल्हयात बोराइबारी बॉर्डरवर तणाव निर्माण झाला होता. तिथल्या नो-मॅन्स-लँड भागात BSF ने 14 जणांना (पुश-इन) म्हणजे बांग्लादेशमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिक आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बॉर्डरच्या पिलर नंबर 1067 जवळ झाली. BSF च्या जवानांनी 9 पुरुष आणि 5 महिलांना बांग्लादेशमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला.
काही प्रत्यक्षदर्शींनुसार BSF कडून चार राऊंड फायरिंग झाली. BGB ने हा दावा फेटाळून लावला आहे. घटनास्थळी पोहोचून त्यांनी परिस्थिती शांततेने हाताळली. बॉर्डर पार करताना ज्या लोकांना पकडण्यात आलं, ते आता नो मॅन्स लँडमध्ये अडकले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ते सर्व भारताच्या बंदरबन जिल्ह्याचे निवासी असू शकतात. बांग्लादेशने त्यांच्या नागरिकतेची अजून पृष्टी केलेली नाही.
फ्लॅग मीटिंगचा प्रस्ताव
BGB चे जमालपुर बटालियन-35 चे असिस्टेंट डायरेक्टर शमसुल हक यांनी सांगितलं की, परिस्थिती नियंत्रणात आहे. गोळीबार झाल्याची बातमी अफवा आहे. बीजीबीने शांतता कायम ठेवण्यासाठी फ्लॅग मीटिंगचा प्रस्ताव दिला आहे. बातमी लिहिताना बीएसएफकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही
घटनास्थळावर परिस्थिती नियंत्रणात असल्याच सुरक्षा यंत्रणांनी म्हटलं आहे. पण तणाव अजूनही पूर्णपणे निवळलेला नाही. बीएसएफ आणि बीजीबीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत. स्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.
