Indian Ship Attacked : हे सहन करणार नाही, गुजरातच्या जहाजावरील मिसाइल हल्ल्यानंतर भारताचा स्पष्ट शब्दात इशारा
Indian Ship Attacked : हॉर्मुज स्ट्रेटमधून ओमानच्या किनाऱ्यावरुन जाणारं गुजरातचं मालवाहतूक जहाजं बुडालं. 'हाजी अली' नावाचं हे जहाज 13 मे च्या सकाळी ओमानच्या समुद्री क्षेत्रातून जात होतं.

ओमानच्या किनाऱ्यावर भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने कठोर शब्दात निषेध केला आहे. असे हल्ले अजिबात सहन केले जाणार नाहीत हे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. बुधवारी ओमानाच्या किनार्यावर भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर झालेला हल्ला कुठल्याही परिस्थिती मान्य नाही असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. व्यावसायिक जहाजं आणि सर्वसामान्य नाविकांना वारंवार लक्ष्य केलं जातय याचा आम्ही निषेध करतो, असं भारताने म्हटलं आहे. भारतीय चालक दल पूर्णपणे सुरक्षित असल्याची परराष्ट्र मंत्रालयाने पुष्टि केली आहे. भारताने ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. जहाजावरील भारतीय क्रू सुरक्षित असून त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो असं परराष्ट्र मंत्रालयाने लिहिलं आहे. व्यावसायिक जहाजांना टार्गेट करणं आणि निष्पार क्रू सदस्यांचा जीव धोक्यात टाकणं अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत असं भारताने म्हटलं आहे.
हॉर्मुज स्ट्रेटमधून ओमानच्या किनाऱ्यावरुन जाणारं गुजरातचं मालवाहतूक जहाजं बुडालं. ‘हाजी अली’ नावाचं हे जहाज 13 मे च्या सकाळी ओमानच्या समुद्री क्षेत्रातून जात होतं. त्यावेळी त्यावर ड्रोन किंवा मिसाइलने हल्ला झाला. या नंतर जहाजामध्ये आग भडकली. ओमानच्या कोस्टगार्डने सर्वच्या सर्व 14 क्रू मेंबर्सचे प्राण वाचवले. काही रिपोर्ट्सनुसार, 13 मे च्या सकाळी एमएसवी हाजी अली जहाज बुडालं. गुजरातच्या द्वारकामध्ये राहणारे सुलतान अहमद अंसार यांच्या मालकीचं हे जहाज होतं. बेरबेरा बंदरातून हे जहाज शारजाह येथे चाललं होतं.
3.30 च्या सुमारास या जहाजावर हल्ला झाला
पहाटे 3.30 च्या सुमारास या जहाजावर हल्ला झाला. जहाजावर स्फोटकासारखं काहीतरी येऊन आदळलं असं चालक दलाच्या सदस्याने सांगितलं. त्यानंतर जहाजाने पेट घेतला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून जहाजावरील 14 क्रू मेंबर्सनी लाइफ जॅकेट घातलं व जहाज सोडलं. यावेळी ओमानी कोस्ट गार्डने भारतीय खलाशांची मदत केली. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून जलवाहतूक जवळपास ठप्पच आहे. अमेरिका आणि इराण दोघांनी नाकेबंदी करुन ठेवली आहे. काही जहाजं धोका पत्करुन इथून प्रवास करतायत. काहीवेळा जहाजांवर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत.