AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत भारतीय जहाजांवर हल्ले, भारत अखेर मैदानात उतरलाच, थेट इराणच्या..

होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. इतर देशांसोबतच भारतीय जहाजांवरही होर्मुज खाडीत हल्ले होत आहेत. इराणजवळ अमेरिकेने मोठी नाकेबंदी केली. होर्मुज खाडीत तणाव आहे. यादरम्यानच आता भारताने अत्यंत मोठा निर्णय घेतला.

होर्मुज खाडीत भारतीय जहाजांवर हल्ले, भारत अखेर मैदानात उतरलाच, थेट इराणच्या..
Strait of Hormuz
| Updated on: May 12, 2026 | 10:36 AM
Share

होर्मुज खाडीत मोठं संकट आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून तणाव कमी व्हायचा तर तणाव अधिक वाढत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध काही थांबत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे संकट जगापुढे उभे आहे. तेलाची मोठी समस्या आहे. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. इकडे अनेक देशांकडे तेल शिल्लक नाही. तेल कमी वापरा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणची तेल निर्यात ठप्प आहे. तेल ठेवण्यासाठी जागा नसल्याने इराणकडून समुद्रात तेल फेकून दिले जात आहे. या युद्धाचा जागतिक बाजारावर वाईट परिणाम होत आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे. होर्मुज खाडीत भारताचेही अनेक तेलवाहू जहाज अडकून पडली आहेत. हे जहाज सुरक्षित काढण्याकरिता भारताकडून मोठे प्रयत्न केली जात आहेत. भारतीय जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. हेच नाही तर जहाज बुडवण्याचाही प्रयत्न झाला.

अमेरिका आणि इराणकडून कोणीही भारतीय जहाजावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. आता होर्मुज खाडीतील संकटात समोरासमोर बसून चर्चा करण्याची वेळ आली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाताना भारतीय जहाजांना येणाऱ्या अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी इराण काय करू शकतो, यावर भारत चर्चा करेल. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, या आठवड्यात नवी दिल्लीत ब्रिक्स शेर्पा आणि परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये होर्मुज खाडीतून तेलवाहू जहाजांना सुरक्षित रस्ता कसा देता येईल, यावर भारत इराणसोबत प्रत्यक्षात चर्चा करणार आहे. भारताचे अजूनही काही जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत. ईटीच्या वृत्तानुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची 14-15 मे रोजी होणाऱ्या परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत तर या बैठकीत उप परराष्ट्र मंत्री इराणचे नेतृत्व करू शकतात.

यावेळी भारत इराणसोबत होर्मुज खाडीतील सध्याच्या स्थितीवर चर्चा करेल. फक्त हेच नाही तर भारतीय जहाजांना सुरक्षित काढण्यासाठी काय करता येईल, यावरही चर्चा होईल. होर्मुज खाडी आता युद्धाचे मैदान बनली आहे. होर्मुज खाडीत यापूर्वी भारतीय जहाजांना थेट पणे टार्गेट करत हल्ला करण्यात आला. होर्मुजमध्ये अडकलेल्या जहाजांची सुरक्षा भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...