AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा नूर खान एअरबेसवर धक्कादायक प्रताप, जगात खळबळ, भारतात थेट..

पाकिस्तानवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वत: च्या हातावर दगड मारल्यासारखेच आहे. अमेरिकेने पाकिस्तानवर विश्वास ठेवला. मात्र, अमेरिकेच्या पाठित मोठा खंजीर पाकिस्तानने खुपसला आहे. जगात खळबळ उडवणारा रिपोर्ट नुकताच पुढे आलाय.

पाकिस्तानचा नूर खान एअरबेसवर धक्कादायक प्रताप, जगात खळबळ, भारतात थेट..
Pakistan Noor Khan Airbase
| Updated on: May 12, 2026 | 7:42 AM
Share

पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर धक्कादायक घटना घडल्या आहेत. भारताला या एअरबेसवर फार पूर्वीपासून संशय आहे. आता या एअरबेसबद्दल धक्कादायक माहिती पुढे आलीये. ज्याने जगात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे अमेरिकेच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ज्याचा साधा विचारली अमेरिकेने कधी केला नाही असे काम पाकिस्तानकडून करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीच्या भूमिकेत आहे. युद्धविराम शांतता बैठक पाकिस्तानमध्ये झाली. मात्र, यातून मार्ग निघू शकला नाही. अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ या बैठकीस हजर झाले. आता पाकिस्तानने मोठा खंजीर अमेरिकेच्या पाठित खुपसला आहे. अमेरिकेच्या ताज्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान फक्त मध्यस्थीचा दिखावा करत आहे. हैराण करणारे म्हणजे इराणी सैन्याच्या विमानांना संभाव्य हवाई हल्ल्यांपासून वाचवण्याकरिता पाकिस्तानने आपल्या नूर खान एअरबेसमध्ये लपवले आहे.

CBS च्या रिपोर्टनुसार, अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 8 एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धसंधीच्या घोषणेनंतर काही वेळातच इराणने आपली लष्करी विमाने पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर नेली आणि तिथे त्यांना लपवण्यात आले. यामध्ये इराणी वायुसेनेचे RC 130 टोही आणि गुप्तचर माहिती गोळा करणाऱ्या विमानाचाही समावेश आहे. अमेरिकेने या रिपोर्टनंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

यावर इस्त्रायलने देखील प्रतिक्रिया दिली. इस्त्रायलने म्हटले की, इस्त्रायलबद्दल पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी केलेल्या विधानाला बघता हे जर खरे असेल तर आम्हाला अजिबातच आश्चर्य होणार नाही. मात्र, पाकिस्तानकडून हा दावा खोटा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अमेरिका पाकिस्तानने केलेल्या विश्वासघातानंतर नक्की काय कारवाई करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

अमेरिकेची रिपोर्ट खरी असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेला पाकिस्तानने मोठा धोका दिलाय. त्यामुळे आता मध्यस्थीच्या भूमिकेतून अमेरिकेने पाकिस्तानला लाथ मारून बाहेर काढू शकते. मुळात म्हणजे पाकिस्तानच्या मध्यस्थीवरच अनेक देशांनी थेट संशय व्यक्त केला होता. त्यामध्येच अमेरिकेच्या रिपोर्टनंतर एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी होर्मुज खाडीतून इराणने पाकिस्तानचे मालवाहू जहाज देखील सोडले होते. त्याने आता संशय अधिक वाढताना दिसत आहे.

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा