जगात खळबळ! भारताची रशियाकडून तेल खरेदी बंद, अमेरिकेमुळे बिघडला खेळ, आता थेट…

भारतावर गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचा मोठा दबाव बघायला मिळतोय. भारताने रशियाकडून कोणत्याही प्रकारे तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका आग्रही होती. शेवटी अमेरिकेच्या मनात जे होते तेच घडताना दिसत आहे.

जगात खळबळ! भारताची रशियाकडून तेल खरेदी बंद, अमेरिकेमुळे बिघडला खेळ, आता थेट...
India America Russia
| Updated on: Nov 27, 2025 | 2:52 PM

अमेरिकेच्या धोरणामुळे गेल्या काही दिवसांपासून भारत रशियातील संबंध वेगळ्या मार्गावर आहेत. भारत ऊर्जेसाठी रशियावर पूर्णपणे अवलंबून होता. विशेष म्हणजे रशिया देखील भारतात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करत. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत आहेत. रशियाने कायमच बाजार भावापेक्षा भारताला मोठी सूट कच्च्या तेलात दिली. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशियन तेलावर अवलंबून आहे. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर मोठा दबाव अमेरिकेचा आहे. भारताने गेल्या तीन वर्षाच्या कालावधीच सर्वात कमी तेल खरेदी या महिन्यात केल्याचे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेने रशियाच्या प्रमुख दोन तेल कंपन्यांवर बंदी घातली. या दोन्ही तेल कंपन्या भारतात मोठ्या संख्येने तेल आयात करत होत्या.

हेच नाही तर अमेरिकेनेही दावा केला की, भारताने जवळपास रशियाकडून तेल खरेदी बंद केली आहे. पुढील काळात पूर्णपणे तेल खरेदी बंद केली जाईल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी दिला. पाश्चात्य देशांनी लादलेल्या कडक निर्बंधांमुळे भारतीय रिफायनरी कंपन्यांनी आता माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, होणारे नुकसान टाळण्यासाठी तेल कंपन्यांकडून विविध मार्गे शोधली जात आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे मॉस्कोवरील निर्बंध आणखी कडक झाले आहेत. अमेरिकेने अलीकडेच रशियाच्या तेल कंपन्यां, रोसनेफ्ट आणि लुकोइल यांना लक्ष्य करून नवीन निर्बंध लादले. बंदी लागू होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये रिफायनरीजनी त्यांचा साठा पुन्हा भरण्यासाठी धाडसी खरेदी केली होती, परंतु डिसेंबरमधील चित्र अगदी वेगळे आहे.

केप्लरच्या आकडेवारीनुसार, या महिन्यात सुमारे 1.87 दशलक्ष बॅरल प्रतिदिन बीपीडी रशियन कच्चे तेल भारतात येण्याची अपेक्षा आहे. सूत्रांचा अंदाज आहे की हा आकडा दररोज 6 लाख ते 6.5 लाख बॅरलपर्यंत घसरेल. रशियाने तेल कच्च्या तेलाच्या बदल्यात भारताला मोठी ऑफर केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली असतानाही अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला नाहीये. यामुळे भारत आता नेमकी काय भूमिका घेतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.