Trump Tariff Policy : इथे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ खेळत बसले, भारताने चीनच्या साथीने केला मोठा गेम, एक्सपोर्टमध्ये इतका मोठा फायदा

Trump Tariff Policy : डोनाल्ड ट्रम्प अजूनही टॅरिफच्या खेळातून बाहेर पडायला तयार नाहीत. आधी त्यांनी 25 टक्के टॅरिफ लावला. मग, रशियाकडून तेल खरेदीचं कारण पुढे करुन भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. 50 टक्के टॅरिफमुळे भारताच आर्थिक नुकसान होईल असं त्यांना वाटलं. पण घडतय उलटच.

Trump Tariff Policy : इथे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ खेळत बसले, भारताने चीनच्या साथीने केला मोठा गेम, एक्सपोर्टमध्ये इतका मोठा फायदा
Donald trump
| Updated on: Oct 27, 2025 | 9:58 AM

एकाबाजूला डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ खेळत आहेत. दुसऱ्याबाजूला भारताने आपल्या निर्यातक देशांच्या लिस्टमध्ये विविधता आणली आहे. त्याचा परिणामही दिसून येतोय. अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचा झिंगा निर्यातीपासून टेक्सटाइल सेक्टरपर्यंत मोठा परिणाम दिसून आला. भारतीय निर्यातदारांनी अमेरिकेच्या या निर्णयानंतर दुसऱ्या देशांच्या बाजाराची वाट पकडली. रिपोर्टनुसार अमेरिकेच्या टॅरिफ दबावाच्या नितीमुळे भारत-चीन संबंध सुधारले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामिहन्यात भारतातून चीनला होणारी निर्यात 22 टक्क्यांनी वाढली आहे.

रिपोर्ट्सनुसार, भारत-चीन व्यापारात सुधारणा झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2025 दरम्यान भारताने चीनला 8.41 अब्ज डॉलरची निर्यात केली. मागच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामहिन्यात एप्रिल ते सप्टेंबर 2024 दरम्यान 6.90 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. त्यात 22 टक्के वाढ दाखवली आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या सेक्टर्समधील प्रोडक्ट्सना चीनमध्ये चांगली मागणी आहे. यात झिंगा आणि अॅल्युमिनियम प्रमुख आहेत. त्याशिवाय अन्य क्षेत्रातूनही चीनला होणाऱ्या निर्यातीत तेजी दिसून आली आहे.

भारताच्या कुठल्या उद्योगाला जास्त फटका बसलेला?

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारल्यानंतर भारतीय झिंगा निर्यातीवर सर्वाधिक वाईट परिणाम दिसून आला. ट्रम्प यांच्या टॅरिफ हल्ल्यानंतर भारतातून अमेरिकेच्या एअर कार्गो निर्यातीत 14 टक्के घसरण नोंदवली गेली. आंध्र प्रदेशच्या झिंगा इंडस्ट्रीला जवळपास 25000 हजार कोटींच नुकसान होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या झिंग्याच्या 50 टक्के ऑर्डर 50 टक्के टॅरिफनंतर रद्द झाल्या असं सांगण्यात आलेलं.

कपडा क्षेत्राची ऑर्डर कमी झाली

त्याशिवाय अन्य प्रभावित सेक्टर्समध्ये अॅल्युमिनियम आणि टेक्सटाइल आहे. त्यांच्यासाठी अमेरिका मोठा बाजार आहे. काही दिवसांपूर्वी कंफेडेरेशन ऑफ इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्री म्हणजे CITI च्या एका सर्वेमध्ये याचे प्रभाव पहायला मिळालेले. निर्यातीवर 50 टक्के टॅरिफ लावल्याने कपडा क्षेत्राची ऑर्डर कमी झाली असून व्यवसायात 50 टक्के घसरण झाल्याचं सर्वेच्या निष्कर्षातून समोर आलेलं.

श फीहोंग यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये काय म्हटलेलं?

भारतातील चीनचे राजदूत श फीहोंग यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर एक पोस्ट करुन भारत-चीन व्यापार वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केलेला. “आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामहिन्यात चीनला होणारी भारताची निर्यात 22 टक्क्याने वाढली. बीजिंग जास्तीत जास्त भारतीय वस्तुंच स्वागत करतो. अमेरिकी टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी मदतीला तयार आहे” असं श फीहोंग यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलेलं.