AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका आणि चीनमधील करार अंतिम टप्प्यात, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरीला चीनही बळी, थेट..

America Tariff : अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे बघायला मिळतंय. चीनवर 100 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावल्याने त्यांची भूमिका बदलल्याचे दिसत आहे.

अमेरिका आणि चीनमधील करार अंतिम टप्प्यात, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दादागिरीला चीनही बळी, थेट..
America and China
| Updated on: Oct 27, 2025 | 8:31 AM
Share

अमेरिका आणि चीनमध्ये मोठे व्यापार युद्ध सुरू आहे. चीनने दुर्मिळ खनिजांची निर्यात बंद केल्याने अमेरिकेचा थयथयाट बघायला मिळाला. फक्त हेच नाही तर थेट चीनवर 100 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून होणार आहे. उलट अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावल्यानंतर दोन्ही देश जवळ आल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका आणि चीनने आसियान शिखर परिषदेदरम्यान बहुप्रतिक्षित व्यापार कराराची रूपरेषा अंतिम केली आहे. यामुळेच आता दोन मोठ्या अर्थव्यवस्थेमधील वाद शांत होण्याचे संकेत आहेत. चीनने अगोदरच स्पष्ट केले की, आमच्यावर तुम्ही 100 टक्के टॅरिफ लावणार असाल तर चीन देखील तुमच्यासोबत तशाच प्रकारची भूमिका घेईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी म्हटले की, आम्ही एका मोठ्या कराराच्या अगदी जवळ आहोत.  व्यापार संतुलन, दुर्मिळ पृथ्वी खनिजे, कृषी आयात, फेंटानिल संकट आणि टिकटॉक यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर प्राथमिक एकमत या बैठकीत झाले आहे. यामुळे आता चीनवर अमेरिका 100 टक्के टॅरिफ लावणार नाही हे स्पष्ट आहे.

अमेरिकेचा हट्टहास फक्त चीनच्या दुर्मिळ खनिजांसाठी आहे आणि चीनने या बैठकीत दुर्मिळ खनिजांवरील निर्बंध हटवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे आता चीनवरील टॅरिफचे संकट टळणार हे स्पष्ट आहे. अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले जातील, असे संकेत स्पष्टपणे असताना दुसरीकडे दोन्ही देश टॅरिफनंतर उलट जवळ आले असून समस्यांमधून मार्ग काढला जातोय.

अमेरिका आणि चीन यांच्यातील करार अंतिम टप्प्यात असून चीनने दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या निर्यातीवरील आपले नियंत्रण कमी करू शकते असे संकेत दिले आहेत, तर अमेरिकेने 100 टक्के नवीन शुल्क टाळण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. चीनने दुर्मिळ खनिजांची निर्यात बंद केल्यानेच अमेरिकेने त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 50 टक्के टॅरिफ लावला. मात्र, रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश चीनच आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.