AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Russia : रशियाने वाचवलं नाही मग भारताने आधार दिला, आता पुतिन त्याच देशाल नवीन युक्रेन बनवण्याच्या तयारीत

India-Russia : "फक्त रशियावर अवलंबून राहणं आमची रणनितीक चूक होती. रशिया आमची सुरक्षा करु शकला नाही" असं या देशाचे पंतप्रधान म्हणाले. रशियाने वाचवलं नाही म्हणून मग भारताने या देशाला पिनाका रॉकेट लॉन्चर सारखी घातक शस्त्र दिली. आता पुतिन यांच्या भूमिकेमुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला मदत होतेय.

India-Russia : रशियाने वाचवलं नाही मग भारताने आधार दिला, आता पुतिन त्याच देशाल नवीन युक्रेन बनवण्याच्या तयारीत
Putin-Modi Image Credit source: Getty Images
| Updated on: May 08, 2026 | 10:35 PM
Share

रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. पण अजूनही हे युद्ध सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली. रशियाकडून आपण तेल खरेदी करतो म्हणून भारतावर निर्बंध लादले. पण अमेरिकेलाही हे युद्ध थांबवता आलेलं नाही. या दरम्यान रशियाने आता आणखी एकादेशाला नवीन युक्रेन बनवण्याचा इशारा दिला आहे. म्हत्वाचं म्हणजे हा देशही सोवियत युनियनमधून फुटून बाहेर पडला आहे. आर्मेनियाची युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्की यांच्याशी जवळीक वाढत चालली आहे. रशियाने यावर हे समजण्यापलीकडच असल्याचं म्हटलं आहे. आर्मेनियाला युरोपियन यूनियन सोबत जवळीक वाढवू नका असा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया जखारोवा साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये म्हणाले की, “आर्मेनियाच्या या भूमिकेमुळे रशियन समाजात नाराजी असून आम्ही हैराण आहोत. आर्मेनिया आमच्यासाठी मित्र, भावासारखा देश आहे. त्यांचा एक प्लॅटफॉर्म म्हणून वापर करण्यात आला. कोणासाठी? एका दहशतवाद्यासाठी”

‘आर्मेनियाच्या विद्यमान नेतृत्वापैकी कोणीही जेलेंस्कीचा अपमान केला नाही. तर तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?’ असा प्रश्न मारिया जखारोवा यांनी विचारला. त्यावर आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान म्हणाले की, ‘2022-2023 मध्ये मी हे स्पष्ट केलय की, युक्रेनच्या मुद्यावर आम्ही रशियाला साथ देणार नाही’ रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मारिया जखारोवा यांनी आर्मेनिया आणि युरोपियन युनियनच्या संयुक्त घोषणेवरही टीका केली. ही रशियाविरोधी कृती मानली जाईल. आर्मेनियाला याचे गंभीर राजकीय आणि आर्थिक परिणाम भोगावे लागतील असा इशारा जखारोवा यांनी दिला.

व्लादीमीर पुतिन यांनी काय इशारा दिलेला?

आर्मेनियाची लोकसंख्या 30 लाख आहे. इराण आणि तुर्कीला या देशाची सीमा लागून आहे.मागच्यावर्षी या देशाने एक कायदा मंजूर केला. ज्यात युरोपियन युनियनच्या सदस्यतेसाठी अर्ज करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी एप्रिल महिन्यात पशिन्यानला इशारा दिलेला की, ‘आर्मेनिया एकाचवेळी युरोपियन यूनियन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील सीमा शुल्क ब्लॉक दोघांचा सदस्य बनू शकत नाही’

आर्मेनिया रशियापासून लांब का जातोय?

आर्मेनियाने 1991 साली आपल्या सुरक्षेसाठी रशियावर विश्वास ठेवला. रशियाचा आर्मेनियात मिलिट्री बेसही आहे. 2020 आणि 2023 मध्ये अजरबैजानने नागोर्नो-काराबाख प्रांतावर हल्ला केला. त्यावेळी रशियाने मदत केली नाही. रशियन शांती सैन्य तिथे तैनात होतं. अजरबैजानने सगळा भूभाग आपल्या ताब्यात घेतला. 1 लाखापेक्षा जास्त अर्मेनियन लोकांना त्या भागातून पळून जावं लागलं. त्यावेळी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांनी एक स्टेटमेंट केलेलं. “फक्त रशियावर अवलंबून राहणं आमची रणनितीक चूक होती. रशिया आर्मेनियाची सुरक्षा करु शकला नाही”

हे भारतासाठी चांगला संकेत नाहीत

रशियाने काही केलं नाही म्हणून मग आर्मेनिया भारताचा विश्वासू संरक्षण सहकारी बनला. भारताने आर्मेनियाला पिनाका रॉकेट लॉन्चर सारखी घातक शस्त्र दिली.तुर्की-पाकिस्तान-अजरबैजान या देशांचा एक गट आहे. अजरबैजान पाकिस्तानच्या बाजूने आर्मेनिया भारातच्या बाजूने आहे. भारतासाठी आता एकाबाजूला रशिया आणि दुसरीकडे आर्मेनिया आहे. भारताचे युक्रेन बरोबर इतके चांगले संबंध नव्हते, पण आर्मेनिया बरोबर भारताची घनिष्ट मैत्री होत चालली आहे. रशिया अजरबैजानच्या बाजूने जाणं हे भारतासाठी चांगला संकेत नाहीत.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!