AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी आनंदाची बातमी! अमेरिकेला झोंबल्या मिरच्या, थेट…

India's sovereign credit outlook : अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का लागेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था इतकी जास्त मजबूत आहे की, याचा कोणत्याही प्रकारचा फटका बसला नाही. आता नुकताच एक रिपोर्ट पुढे आलीये.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी आनंदाची बातमी! अमेरिकेला झोंबल्या मिरच्या, थेट...
International Market
| Updated on: Sep 20, 2025 | 11:14 AM
Share

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला. हेच नाही तर भारताने अमेरिकेच्या अटी मान्य कराव्यात नाही तर अजूनही काही  निर्बंध लादले जातील असे सांगितले गेले. मात्र, भारताने शेवटपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाही. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर त्याचा थेट परिणाम काही उद्योगांवर झाला. मात्र, होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारताने आपला पुढचा प्लॅन तयार ठेवला. इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावूनही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत असतानाच आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतासाठी जपानकडून आलेली बातमी अत्यंत दिलासादायक नक्कीच म्हणावी लागेल. जपानी रेटिंग एजन्सी रेटिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन इंकने भारताला क्रेडिट रेटिंग ‘BBB’ वरून ‘BBB+’ दिली. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा टॅरिफनंतरही भारताच्या रेटिंगमध्ये मोठी सुधारना झालीये. रेटिंगनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर रेटिंग देण्यात आली आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारतीय अर्थव्यवस्था ढासळणार असे सांगितले जात होते. मात्र, टॅरिफच्या धक्क्यातही ती स्थिर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग अपग्रेड करण्याची ही तिसरी वेळ आहे. विशेष म्हणजे भारताला चांगली रेटिंग देखील मिळाली. अर्थ मंत्रालयाने देखील संशोधन आणि विकासाच्या निर्णयाचे स्वागत केले आणि म्हटले की पाच महिन्यांत तीन एजन्सींनी केलेले रेटिंग अपग्रेड हे भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या व्यवस्थापनाला जागतिक मान्यता मिळाल्याचे प्रमाण आहे.

भारतावर अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर लगेचच प्रशासनाने पर्यायी मार्ग शोधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान दाैऱ्यावर गेले. एस. जयशंकर हे रशियाच्या दाैऱ्यावर गेले आणि काही महत्वाचे करार केले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापेक्षा अधिक सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून अधिक तेल खरेदी केले. हेच तेल भारताने रशियाकडून खरेदी करू नये, याकरिता अमेरिका भारतावर दबाब टाकत होती. अमेरिकेने स्पष्ट म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ काढू.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...