
रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये मोठा तांडव बघायला मिळाला. पाकिस्तानकडून मोठा हवाई हल्ला काल रात्री करण्यात आला. दहशतवादी अड्डा समजून पाकिस्तानने एका रूग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यात 400 पेक्षाही अधिक निर्दाेष लोकांचा जीव गेला. हवाई हल्ल्यानंतर या इमारतीला मोठी आग लागली. अफगाणिस्तानकडून या हल्ल्याचा बदला घेण्याचा थेट मोठा इशारा देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव बघायला मिळत आहे. सतत एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या 5 ठिकाणांना टार्गेट करून काल रात्री मोठे हल्ले केले. या हल्ल्यात तब्बल 400 पेक्षाही अधिक लोकांचा जीव गेला. कित्येक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्ताने केलेल्या या हवाई हल्ल्यानंतर भारताने पाकला खडेबोल सुनावले आहेत.
काबूलमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारताने पहिली मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून या घटनेचा निषेध केला. या हल्ल्याला अमानवीय आणि निंदनीय असल्याचे भारताने म्हटले. हेच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायाने गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी देखील भारताकडून करण्यात आली. हे अजिबात सहन केले जाणार नसल्याचेही भारताने सांगितले.
या हल्ल्यावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की, रुग्णालय ही एक अशी संस्था होती जिला कोणत्याही परिस्थितीत लष्करी लक्ष्य मानले जाऊ शकत नाही. लष्कर कारवाई म्हणून विचित्र करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असल्याचेही भारताने म्हटले आहे. अफगाणिस्तानमधून काही धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत, ज्याने खळबळ उडाली.
थेट रूग्णालयाची अख्खी इमारत आगीच्या कचाट्यात आली. पाच ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आली. निवासी भागात पकिस्तानकडून हे हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली असून बदला घेण्याची भाषा केली जात आहे. मुळात म्हणजे मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तणाव बघायला मिळत आहे. त्यामध्येच हा घातक हल्ला करण्यात आला.