डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने पाडले तोंडावर, अमेरिकेचा धादांत खोटेपणा जगापुढे, तब्बल 8 वेळा…
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यापासून धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. त्यामध्येच आता भारताबद्दल अत्यंत मोठा दावा करण्यात आला. ज्याने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 500 टक्के टॅरिफ लावण्याबद्दल धक्कादायक विधान केले. अमेरिकेने भारतवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी थेट 500 टक्के टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता अमेरिकेचा दबाव आहे. यादरम्यान भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू होत्या. मात्र, करार काही होऊ शकले नाहीत. अमेरिकेला भारताला अनेक गोष्टी विकायच्या होत्या. मात्र, त्यामधून भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने भारत यावर विचार करत होता. काल अमेरिकेतून एक विधान आले आणि व्यापार करार का होऊ शकले नाहीत, याबद्दल मोठा दावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक फोन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तो फोन केला नसल्यानेच व्यापार करार होऊ शकले नसल्याचे थेट अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटले.
ज्यावेळी आम्हाला भारताचा फोन व्यापार करार करण्याबद्दल आला त्यावेळी आम्ही पुढे निघून गेलो होतो. आता जरी भारताला आमच्यासोबत व्यापार करार करायची असतील तर त्यांना अगोदरप्रमाणे किंवा अगोदरची डिल मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे थेट भारताने स्पष्टपणे म्हटले आहे. शिवाय मोठा खुलासाही केला.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर भाष्य केले. भारत आणि अमेरिकेत फेब्रुवारीपासून व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाटाघाटी झाली. पण अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे. मुळात म्हणजे विषय असा आहे की, 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्बल 8 वेळा फोनवरून संवाद झाला आहे.
दोघांमध्ये व्यापार करारावर चर्चा झाली. हेच नाही तर दोन्ही देश व्यापार कराराच्या अगदी जवळही पोहोचले होते. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पुरक असून फायदा होऊ शकतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नसल्यानेच व्यापार करार होऊ शकले नसल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारताने स्पष्ट केले. अमेरिकेतून नरेंद्र मोदी यांनी फोन न केल्याने व्यापार करार होऊ शकले नसल्याचे सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
